कोरोनाचा पुन्हा कहर; क्रूझ जहाजातील 800 प्रवाशांना कोरोनाची लागण, अधिकाऱ्यांनी सिडनीत थांबवलं जहाज

सिडनी : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा सुरु झाला आहे. ओमिक्रॉनचे व्हेरिएंट पुन्हा एकदा जगभर कहर करत आहेत. आता क्रूझ जहाजामध्ये तब्बल 800 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ऑस्ट्रेलियातील सिडनी  शहरात हे जहाज थांबवण्यात आलंय.मॅजेस्टिक प्रिन्सेस क्रूझ जहाज  न्यूझीलंडहून निघालं होतं आणि त्यात सुमारे 4,600 प्रवासी आणि चालक दल होतं. क्रूझ ऑपरेटर मार्गुरिट फिट्झगेराल्ड यांनी सांगितलं की, हा प्रवास 12 दिवसांचा होता. यामध्ये मोठ्या संख्येनं लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.



मोठ्या संख्येनं प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळ्यानं खळबळ उडालीय. जहाजाचं कामकाज घाईघाईनं थांबवण्यात आलंय. क्लेअर ओनील म्हणाले, अधिकाऱ्यांनी नियमित प्रोटोकॉल ठेवले आहेत. मॅजेस्टिक प्रिन्सेस जहाजातून प्रवाशांना कसं बाहेर काढायचं हे ठरवण्यासाठी न्यू साउथ वेल्स हेल्थ पुढाकार घेत आहे. एजन्सीनं सांगितलं की, ते प्रवासी आणि क्रू मेंबर्सच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी क्रूझ शिप क्रूसह काम करत आहेत. कंपनीचे अध्यक्ष मार्गुराइट फिट्झगेराल्ड यांनी एबीसी टेलिव्हिजनला सांगितलं की, ऑस्ट्रेलियातही कोरोनाची प्रकरणं सातत्यानं वाढत आहेत. 2020 च्या सुरुवातीला याच कंपनीच्या रुबी प्रिन्सेस क्रूझ शिपमध्ये सुमारे 900 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. यामध्ये सुमारे 28 जणांचा मृत्यू झाला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने