'भारत 2027 पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल'

नवी दिल्ली : विविध जागतिक आव्हाने असतानाही भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. पुढील पाच वर्षांत म्हणजे 2027 पर्यंत भारत अमेरिका आणि चीननंतर जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकते. चेतन अह्या, मुख्य अर्थशास्त्रज्ञ (आशिया) यांनी एका लेखात म्हटले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार मोठा आहे. त्यामुळे भविष्यात भारतीय अर्थव्यवस्था जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनू शकते.भारताचा जीडीपी पुढील 10 वर्षांत दुप्पट होऊन 85 ट्रिलियन डॉलरवर जाईल. सध्या भारतीय अर्थव्यवस्था 3.4 ट्रिलियन डॉलरवर आहे. विशेष म्हणजे भारताचा जीडीपी दरवर्षी 400 अब्ज डॉलरने वाढेल. या बाबतीत फक्त अमेरिका आणि चीनच भारताच्या पुढे असतील. 2032 पर्यंत, भारतीय बाजाराचे भांडवल 3.4 ट्रिलियन डॉलर वरून 11 ट्रिलियन डॉलर पर्यंत वाढेल आणि ते जगातील तिसरे सर्वात मोठे बाजार भांडवल असेल.



भारत उत्पादन निर्यात वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. नवीन कारखान्यांमुळे संघटित क्षेत्रात अधिक रोजगार निर्माण होतील. त्यासोबतच उत्पादकता वाढेल. भारताच्या धोरणातील बदलामुळे निर्यातीचा फायदा, बचत वाढवणे आणि त्यातून गुंतवणूक करणे या गोष्टी होतील.चेतन अह्या यांच्या मते, अनुकूल देशांतर्गत आणि जागतिक परिस्थितीच्या प्रभावामुळे भारतीय जीडीपी  अधिक वेगाने पुढे जाईल. गुंतवणूक आणि रोजगार वाढवण्यासाठी भारताने देशांतर्गत धोरणांमध्ये व्यापक बदल केले आहेत. त्यामुळे उत्पादन निर्यात वाढेल.जीएसटी लागू झाल्यामुळे भारताला एकत्रित देशांतर्गत बाजारपेठ बनविण्यात मदत झाली आहे. गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी कॉर्पोरेट कर कपात केली जात आहे. पीएलआय योजना सुरू केली आहे. यामुळे परदेशी गुंतवणूकदार येण्यास मदत होत आहे.

भारतात कार्यरत तरुणांची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. त्यासोबतच डिजिटलायझेशन झपाट्याने वाढत आहे. येत्या दशकात भारताचा वास्तविक विकास दर सरासरी 6.5% असेल. या काळात चीनचा GDP 3.6% दराने वाढेल.1991 नंतर भारताचा GDP 3 ट्रिलियन डॉलरवर आणण्यासाठी 31 वर्षे लागली. आता अतिरिक्त 3 ट्रिलियन डॉलर जोडण्यासाठी फक्त 7 वर्षे लागतील. जागतिक गुंतवणूकदारांसाठी हा दर महत्त्वाचा ठरणार आहे. पुढील दशकातही अमेरिका आणि चीन जागतिक गुंतवणूकदारांसाठी तितकेच महत्त्वाचे राहतील, असे चेतन चेतन अह्या म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने