किंग चार्ल्स यांच्यावर अंडी फेकणाऱ्याला अनोखी शिक्षा; आता कधीच करता येणार नाही 'हे' काम

ब्रिटन : ब्रिटनचे किंग चार्ल्स आणि त्याची पत्नी कॅमिला यांच्यावर अंडी फेकल्याप्रकरणी एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली होती. इंग्लंडमधील यॉर्क शहरातील 'मिकलेगेट बार लँडमार्क' येथे लोकांना अभिवादन करताना किंग चार्ल्स यांच्यावर बुधवारी अंडी फेकण्यात आली होती, त्यानंतर या अंडी फेकणाऱ्या विद्यार्थ्याला अनोखी सजा देण्यात आली आहे.

या अंडी फेकणाऱ्या विद्यर्थ्याला आता सार्वजनिक ठिकाणी अंडी घेऊन जाता येणार नाहीयेत. तसेच याचसोबतच त्याला भविष्यात किंग चार्ल्सपासून 500 मीटर दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.त्या व्यक्तीने फेकलेली अंडी किंग चार्ल्स यांच्या जवळून निघून गेली होती. सोशल मीडियावरील फोटोमध्ये किंग चार्ल्स यांच्या पायाजवळ एक अंडे पडल्याचे दिसत होते. तथापि, चार्ल्स यांचे सुरक्षा अधिकारी तातडीने त्याच्या बचावासाठी समोर आले. 23 वर्षीय आरोपी पॅट्रिक थेलवेल पकडला गेला तेव्हा त्याने ओरडून 'हा देश गुलामांच्या रक्ताने बनला आहे' असा घोषणा दिल्या. सध्या आरोपीची पोलिस जामिनावर सुटका झाली आहे.



किंग चार्ल्स यांच्याव अंडी फेकल्याबद्दल आरोपीने म्हटले आहे की, यासाठी त्याला जमावाने भडकावले. या घटनेनंतर त्याला जीवे मारण्याच्या धमक्याही येत असल्याचे त्याने सांगितले. दरम्यान पकडल्यानंतर पोलिसांनी पॅट्रिक थेलवेलची चौकशी केली आणि नंतर त्याची जामिनावर सुटका केली.मला रात्री 10 वाजताच सोडण्यात आल्याचे थेलवेल यांने सांगितले. माझे मित्र माझी वाट पाहत होते. माझे वकील खूप चांगले होते. तसेच थेलवेलने सांगितले की, या घटनेनंतर लोक माझे केस पकडत होते आणि काही लोक माझ्यावर थुंकत देखील होते. तसेच लोक मला इंस्टाग्रामवर मेसेज करून धमकावत आहेत असेही त्याने सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने