खुनाचा तपास CBI कडे सोपवा; उच्च न्यायालयात याचिका दाखल

दिल्ली: दिल्लीतल्या श्रद्धा वालकर खून प्रकरणामुळे देशभरात खळबळ माजली आहे. या प्रकरणात दिवसेंदिवस विविध खुलासे होत आहेत. दिल्ली पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र आता हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.एका वकिलाने दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणी याचिकाही दाखल केली आहे. श्रद्धा वालकर खून प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी याचिका दाखल करत दिल्ली उच्च न्यायालयाकडे केली आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांचा तपास योग्य रितीने होत नाही. दिल्ली पोलिसांकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही, तसंच त्यांच्याकडे तांत्रिक आणि वैज्ञानिक कौशल्याची आणि उपकरणांचीही कमतरता आहे. त्यामुळे ६ महिन्यांपूर्वी झालेल्या खुनाचे पुरावे आणि साक्षीदार शोधण्यास दिल्ली पोलीस सक्षम नाहीत, असं या याचिकेत म्हटलं आहे.



आत्तापर्यंत या प्रकऱणात काय घडलं?

१. आरोपी आफताब अमीन पुनावाला याने आपल्या गुन्ह्याची कबुली देत श्रद्धाचे तुकडे केल्याचं सांगितलं. तसंच हे तुकडे आपण जंगलात टाकल्याचं सांगितलं.

२. आफताबने आपण गुन्हा कसा केला, श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली, याबद्दल दिल्ली पोलिसांना माहिती दिली.

३. त्यानंतर दिल्ली पोलीस त्याला जंगलात घेऊन गेले, जिथे आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे टाकले होते.

४. त्यापैकी एका ठिकाणावरुन एक मानवी जबडा आणि तीन हाडं पोलिसांना सापडली आहेत. ही हाडे श्रद्धाची आहेत की नाही, याचा डीएनए चाचणीच्या माध्यमातून शोध घेतला जाईल.

५. आज आफताबची नार्को टेस्ट केली जाणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने