अमेरिकेचा Air India ला दणका; ग्राहकांना परत द्यावे लागणार 985 कोटी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

नवी दिल्ली : अमेरिकेनं टाटा समूहाची अरलाइन एअर इंडियाला $121.5 दशलक्ष (सुमारे 985 कोटी रुपये) परत करण्यास सांगितलंय. विमान रद्द केल्यामुळं (कोरोना महामारीच्या काळात) आणि वेळापत्रकात बदल झाल्यामुळं एअर इंडियाला हा परतावा प्रवाशांना परत करावा लागणार आहे. यासोबतच रिफंड परत करण्यात विलंब केल्याबद्दल 1.4 मिलियन डॉलर (सुमारे 11 कोटी रुपये) दंडही ठोठावण्यात आला आहे.यूएस परिवहन विभागानं  सोमवारी सहा एअरलाइन्सना एअर इंडियासह एकूण $600 दशलक्ष ग्राहकांना परत करण्यास सांगितलंय. अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एअर इंडियानं 'Refund on request' हे यूएस परिवहन विभागाच्या धोरणाच्या विरुद्ध आहे. फ्लाइटच्या वेळापत्रकात बदल झाल्यास किंवा फ्लाइट रद्द झाल्यास कायदेशीररित्या एअरलाइनला पैसे परत करावे लागतात.




एअर इंडियाला दंड का ठोठावला?

माहितीनुसार, यूएस परिवहन विभागाकडं दाखल केलेल्या 1,900 रिफंड अर्जांपैकी निम्म्याहून अधिक पैसे परत करण्यासाठी एअर इंडियाला 100 दिवसांपेक्षा जास्त वेळ लागला. यासोबतच सर्व अर्जांना परतावा देण्याची नेमकी वेळही कंपनी सांगत नव्हती.

'या' विमान कंपन्यांनाही ठोठावला दंड

यूएस परिवहन विभागानं एअर इंडियाला $222 दशलक्ष परतावा आणि फ्रंटियर एअरलाइन्सला $2.2 दशलक्ष दंड भरण्यास सांगितलंय. त्याच वेळी, TAP पोर्तुगाल ($126.5 दशलक्ष परतावा आणि $1.1 दशलक्ष दंड), एव्हियान्का ($76.8 दशलक्ष परतावा आणि $750,000 दंड), EI AI ($61.9 दशलक्ष परतावा आणि $900,000 दंड) आणि एरो मेक्सिको 13.6 दशलक्ष डॉलर असा दंड ठोठावला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने