दुबईला जाण्याआधी पासपोर्ट चेक करा, असं नाव असलेल्या भारतीयांना प्रवेश बंदी

दिल्ली : जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे आगामी काळात नोकरीसाठी किंवा इतर कामांसाठी UAE ला जाण्याच्या विचारात असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे.यूएई सरकारने त्यांच्या प्रवास मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल केला आहे. नव्या बदलांनुसार आता जर कोणत्याही व्यक्तीच्या पासपोर्टवर केवळ त्याचे पहिले नाव लिहिलेले असेल तर, अशा व्यक्तींना या देशात प्रवेश नाकारला जाणार आहे. म्हणजेच युएईला जाण्यासाठी तुमच्या पासपोर्टवर तुमचे संपूर्ण नाव असणे आवश्यक आहे.

UAE सरकारच्या मते, सर्व प्रवाशांच्या पासपोर्टवर नाव आणि आडनाव दोन्ही स्पष्ट असणे आवश्यक आहे. 21 नोव्हेंबरपासून यूएईनेही हा नवा नियम लागू केला आहे. यूएई सरकारचा हवाला देत एअरलाइन्स कंपनी इंडिगोनेही एक निवेदन जारी केले आहे.इंडिगोने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "यूएई प्रशासनाच्या सूचनेनुसार, ज्या प्रवाशांच्या पासपोर्टवर केवळ पहिले नाव आहे अशा प्रवाशांना युएईसाठी प्रवासास परवानगी दिली जाणार नाहीये.



कायमस्वरूपी व्हिसाधारकांसाठी सूट कायम

दरम्यान, एखाद्या व्यक्तीकडे कायमस्वरूपी UAE व्हिसा असेल तर त्यांना प्रवासासाठी परवानगी आवश्यक असेल, परंतु यासाठी त्यांना नाव आणि आडनाव या दोन्ही कॉलममध्ये एकच नाव लिहून पासपोर्ट अपडेट करावा लागेल. जर एखाद्या प्रवाशाला याहून अधिक माहिती हवी असेल तर संबंधित व्यक्ती वेबसाइटवर जाऊन अधिकचे तपशील मिळवू शकते असे इंडिगोने स्पष्ट केले आहे.

नेकांना करावा लागतोय अडचणींचा सामना

युएईकडून करण्यात आलेल्या या नव्या नियमावलीमुळे अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे खलीज टाईम्सने म्हटले आहे. तर, दुसरीकडे नव्या नियमांच्या घोषणांनतर अनेक ट्रॅव्हल एजंट लोकांना व्हिसासाठी अर्ज करण्यापूर्वी पुढील अपडेटची प्रतीक्षा करण्यास सांगत आहेत.

नव्या नियमांचा सर्वाधिक फटका भारतीयांना

यूएई सरकारच्या नव्या निर्णयानंतर सर्वाधिक फटका भारतीय नागरिकांना बसणार आहे. कारण युएईमध्ये मोठ्या संख्येने भारतीय नागरिक ये-जा करत असतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने