रुग्णालय ते शिर्डी, शिर्डी ते रुग्णालय; दोन्ही हातांना पट्ट्या बांधून पवारांचा प्रवास

शिर्डी:  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा सध्या शिर्डी इथं सुरू आहे. यासाठी राष्ट्रवादीचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील आता शिर्डीसाठी रवाना झाले आहेत. पवारांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, शिबीर संपल्यावर ते पुन्हा रुग्णालयात दाखल होतील.



गेल्या तीन ते चार दिवसांपासून शरद पवार यांच्यावर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचीही माहिती हाती येत आहे. अशातच राष्ट्रवादीच्या या शिबिरासाठी शरद पवार रुग्णालयातून थेट शिर्डी येथे दाखल झाले आहेत. तिथे जाऊन ते उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. पवार आता हेलिकॉप्टरने शिर्डीकडे रवाना झाले आहेत.

मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयातून शरद पवार थेट महालक्ष्मी रेसकोर्सकडे निघाले. तिथून हेलिकॉप्टरने त्यांनी शिर्डीकडे मार्गक्रमण केलं. यावेळी त्यांच्या दोन्ही हाताला पट्टया बांधलेल्या दिसून आल्या. यावेळी शरद पवार यांच्यासोबत डॉक्टरांची एक टीमही असेल. तिथे त्यांच्या आरोग्यवर लक्ष ठेवलं जाईल आणि त्यानंतर पुढील उपचारांची दिशा ठरवली जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने