अजित पवार नाराज? राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिराला सलग दुसऱ्या दिवशी गैरहजर

मुंबई - शिवसेनेला खिंडार पडल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांचे विधान ताजे असतानाच आता राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या नाराजीबाबत वृत्त आलं आहे. 



शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंथन शिबीर सुरू आहे. या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते हजर आहेत. शिवाय आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार देखील हजर होते. मात्र अजित पवार अजूनही या मेळाव्याला पोहोचले नाहीत. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.याआधीची राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीतील कार्यक्रमात अजित पवार नाराज होऊन निघून गेले होते. मात्र त्यावेळी आपण नाराज नसून लघुशंकेला गेलो होते, असं ते म्हणाले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याचा दुसरा दिवस असूनही अजित पवार मेळाव्याला आलेले नाहीत.दरम्यान शरद पवार हजर असलेल्या कार्यक्रमात अजित पवार सहसा जात नाहीत. मात्र मेळावा कालपासून सुरू आहे. पहिल्या दिवशीही अजित पवार हजर न राहिल्याने नाराजीच्या चर्चांना उधाण आलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने