पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी दक्षिण भारतातील पहिल्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला दाखवला हिरवा झेंडा

बंगुळरु : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज(शुक्रवार)पासून दक्षिण भारतामधील चार राज्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचदरम्यान आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण भारतामधील मैसूर आणि चेन्नई दरम्यानच्या पहिल्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला बंगुळरुमधील केएसआर स्टेशनवरून हिरवा झेंडा दाखवला. याचबरोबर मोदींनी भारत गौरव काशी दर्शन ट्रेनलाही हिरवा झेंडा दाखवला.




पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दक्षिण भारतातील दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेण्यात आलेली आहे. मोदी आज तामिळनाडूला रवाना होणार आहेत.या अगोदर पंतप्रधा मोदी आज सकाळी बंगळुरुच्या एचएएल विमानतळावर पोहचले. जिथे कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, मंत्रिमंडळातील अनेकमंत्री, केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी, भाजपा प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील, भाजपा संसदीय बोर्डाचे सदस्य येडियुरप्पा, पक्षाचे आमदार आणि अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने