वजन कमी करण्यासाठी व्यायाम करताय? सकाळी नको संध्याकाळी करा, तज्ज्ञांचं मत

 मुंबई : दुपारी किंवा संध्याकाळी वजन कमी करण्यासाठी जीममध्ये जाणाऱ्या लोकांचं वजन सकाळी व्यायाम करणाऱ्यांपेक्षा लवकर कमी होतं. असं एका अभ्यासातून समोर आलं आहे.



काय सांगतो अभ्यास

  • दुपार ते मध्यरात्र या वेळात इन्शुलिन रेझिस्टन्स कमी होतं. त्यामुळे एक चतुर्थांश वजन वाढू शकतं.

  • त्यामुळे तज्ज्ञांचं मत आहे की, या काळात केलेला व्यायामामुळे लेकं त्यांचं वजन कंट्रोल करून कमी करू शकतात. ज्यामुळे टाईप २ डायबेटीसपासून वाचू शकतात.

  • मसल्स, फॅट्स आणि लिव्हरच्या पेशी जेंव्हा इन्शुलिनला नीट प्रतिसाद देत नाहीत तेव्हा इन्शुलिन रेझिस्टंन्स तयार होतो. त्यामुळे रक्तातली साखर घेतली जात नाही. आणि रक्तप्रवाहात साखर वाढवते.

  • यात समोर आलं आहे की, दुपार ते मध्यरात्र दरम्यान विविध हालचाली करणाऱ्यांचं लिव्हर फॅट कमी होतं आणि इन्शुलीन रेझिस्टन्सपण कमी होतो.

  • अभ्यासांतर्गत काही लोकांना सकाळी व्यायाम आणि काहींना संध्याकाळी व्यायम करायला सांगितला.

  • त्यातून समोर आलं की, दिवसभराच्या शारीरिक हालचाली या तुमच्या इन्शुलीन वापरासाठी उपयुक्त ठरतात.

  • त्यामुळे व्यायामाची वेळ हे तुमचं वजन कमी करण्यासाठी आणि टाइप २ डायबेटीस कमी करण्यासाठी महत्वाची ठरते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने