जागतिक विज्ञान दिवस का साजरा केला जातो? काय आहे इतिहास?

नवी दिल्ली : विज्ञानाचा शांतता आणि विकासाबद्दलचा जनमानसातील दृष्टिकोन अधिक प्रगल्भ करण्याच्या उद्देशाने जगभरात आज (10 नोव्हेंबर) शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन साजरा केला जातो. अंतरराष्ट्रीय पातळीवर हा मोठ्या उत्साहात उपक्रम राबवले जातात. 2001 मध्ये UNESCO ने हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर 2002 मध्ये प्रथमच तो साजरा करण्यात आला.



यावर्षीचा हा 20 वा जागतिक विज्ञान दिन असून त्याची ‘शाश्वत विकासासाठी मूलभूत विज्ञान’ ही या वर्षीची थिम आहे. ही थीम 8 जुलै 2022 पासून सुरू झाली आहे. सामान्य जनमानसात विज्ञानाबद्दल जागृती वाढावी, विज्ञानाचा शांततेसाठी आणि विकासासाठी वापर व्हावा यासाठी हा दिवस साजरा केला जातो.याबरूरच विविध देशांमध्ये वैज्ञानिक संशोधानांची देवाणघेवाण करणे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विज्ञान समित्यांची अथवा. व्यासपीठांची स्थापना करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे. तसेच, जगभरातून येणाऱ्या समस्यांकडे वैज्ञानिक जगताचे लक्ष वेधने, असेही हा दिवस साजरा करण्यामागे उद्देश आहेत.

थोडक्यात इतिहास

युनेस्को आणि इंटरनॅशनल कौन्सिल फॉर सायन्स यांनी 1999 मध्ये जागतिक विज्ञान परिषद भरवली होती. हा कार्यक्रम बुडापेस्ट येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जागतिक पातळीवर प्रत्येक वर्षी विज्ञानाचा आणि शास्त्रज्ञांच्या ज्ञानाचा वापर, उद्दिष्टांची पूर्तता आणि त्यांची वचनबद्धता निश्चित केली जायची.याच कार्यक्रमात, इथिओपिया आणि मलावी येथील शिष्टमंडळांनी ब्रिटीश असोसिएशन फॉर द अव्हान्समेंट ऑफ सायन्सच्या सहकार्याने जागतिक विज्ञान दिनाचा सर्वांसमोर ठेवला. यानंतर सर्वांचे एकमत झाल्यावर ऑक्टोबर 2000 मध्ये सर्वसाधारण परिषदेच्या 162 व्या सत्रात या दिवसाला मान्यता देण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने