मागल्या 100 वर्षात त्सुनामीत लाखो लोकांनी गमावला जीव

जपान : विश्व त्सुनामी जागरूकता दिवस ५ नोव्हेंबरला साजरा केला जातो. त्सुनामीच्या वारंवार आलेल्या कटू अनुभवानंतर जपानला वर्ल्ड त्सुनामी दिवस साजरा करण्याचं श्रेय दिल्या जातं. भविष्यात त्सुनामीमुळे होणाऱ्या धोक्याचा प्रभाव कमी करण्यासाठी काही शास्त्रज्ञांच्या मदतीने रिसर्च सेंटरही तयार करण्यात आले आहेत.संयुक्त राष्ट्राने या दिवसाला त्सुनामी जागरुकता दिवस घोषित केलंय. जेणेकरून त्सुनामी संदर्भात सूचना येताच मदतकार्यास तज्ज्ञही तयार असतील.



विश्व त्सुनामी जागरूकता दिवसाचा इतिहास

२२ डिसेंबर २०१५ मध्ये संयुक्त राष्ट्राने संकल्प ७०/३ माध्यमातून ५ नोव्हेंबरला विश्व त्सुनामी जागरूकता दिवस असं नाव दिलं. त्सुनामी ही सर्वाधिक नुकसानदायक आणि भयाकन नैसर्गिक आपत्तींपैकी एक आहे. त्सुनामी केवळ समुद्रकिनारी तटीय क्षेत्रांनाच प्रभावित करते.त्सुनामी या प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचे विस्थापन होऊन संबंधित क्षेत्रात अत्यंत विनाशकारी त्सुनामी लाटा निर्माण होऊ शकतात. ज्या मोठ्या प्रमाणात पाण्याचे विस्थापन करतात आणि काही क्षणातच संबंधित क्षेत्रात अत्यंत विनाशकारी त्सुनामी लाटा निर्माण करू शकतात.एकंदरीत आकस्मिक बदल घडवून आणणाऱ्या विशाल सागरी लाटा. जपानी भाषेत या लाटांना त्सुनामी म्हणतात. हाच शब्द आता सर्वत्र वापरला जातो. महासागर अथवा मोठ्या जलाशयाच्या तळभागावर भ्रंश किंवा भेगा पडल्यास त्या खळग्यात किंवा खड्ड्यात पाणी घुसते आणि त्या पाण्याचे स्थानांतरण होऊन प्रचंड लाटांची निर्मिती होते.

100 वर्षात त्सुनामीत लाखो लोकांनी गमावला जीव

मागील 100 वर्षांमध्ये जवळपास 58 त्सुनामी आल्यात. त्यात जवळपास 2,60,000 हून अधिक लोकांचा जीव गेला. या 100 वर्षातील सर्वाधिक मृत्यू डिसेंबर 2004 मध्ये आलेल्या हिंदी महासागरातील त्सुनामीमुळे झाल्यात. यामुळे इंडोनेशिया, श्रीलंका, भारत आणि थायलँड सह 14 देशातील जवळपास 2,27,000 लोकांचा जीव गेला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने