भ्रष्टाचारात अडकलेल्या DSP ला CM योगींचा दणका; पदावरुन हकालपट्टी करत बनवलं 'हवालदार'

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  यांनी भ्रष्टाचाराबाबत  शून्य धोरण स्वीकारलंय. सीएम योगींनी लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याला हवालदार बनवण्याचे निर्देश दिलेत.सीएम योगींनी लाच घेतल्याच्या आरोपावरून रामपूर नगरचे तत्कालीन कार्यक्षेत्र अधिकारी डीएसपी विद्या किशोर शर्मा  यांना मूळ पदावर परत पाठवण्याचा निर्णय घेतलाय. विद्या किशोर शर्मा यांची 2021 मध्ये रामपूर इथं नियुक्ती करण्यात आली होती. तिथं लाचखोरी प्रकरणात प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली.



 यादरम्यान त्यांची चौकशी झाली. चौकशीत विद्या किशोर शर्मा दोषी आढळून आले. त्यानंतर कठोर कारवाई करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी डेप्युटी एसपींना हवालदार बनवण्याचे निर्देश दिले.गृह विभागानं ट्विट करून ही माहिती दिलीय. रामपूरचे तत्कालीन अधिकारी विद्या किशोर शर्मा यांना लाच घेतल्याच्या आरोपावरून त्यांच्या मूळ पदावर परत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सीओ विद्या किशोर शर्मा यांच्यावर रामपूरमध्ये पोस्टिंगदरम्यान लाच घेतल्याचा आरोप होता. चौकशीअंती आरोपात तथ्य आढळल्यामुळं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. विद्या किशोर शर्मांची यूपी पोलिसांत कॉन्स्टेबल म्हणून नियुक्ती झाली होती. प्रमोशन मिळाल्यानंतर ते डेप्युटी एसपी म्हणून रुजू झाले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

2021 मध्ये रामपूरमध्ये सीओ विद्या किशोर शर्मा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. स्वामी विवेकानंद रुग्णालयाचे संचालक विनोद यादव आणि तत्कालीन निरीक्षक रामवीर यादव यांच्यावर सामूहिक बलात्काराचा आरोप एका महिलेनं केला होता. याप्रकरणी पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. याप्रकरणी सीओ विद्या किशोर यांनी पाच लाखांची लाच घेतल्याचा व्हिडिओ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला. यानंतर आरोपी इन्स्पेक्टर रामवीर यादव आणि हॉस्पिटल संचालक विनोद यादव यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आणि तत्कालीन सीओला निलंबित करण्यात आलं. यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार, सरकारनं एएसपी मुरादाबाद यांच्याकडून याची चौकशी केली. तपासात सीओवरील भ्रष्टाचाराचे आरोप खरे असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर कडक कारवाई करत मुख्यमंत्री योगींनी डेप्युटी एसपींना पुन्हा हवालदार बनवण्याचे निर्देश दिलेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने