'तुम्ही 2024 मध्ये फक्त...' भाजपच्या स्मृती इराणींचे राहुल गांधींना चॅलेंज!

दिल्ली: देशभरात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर कॉग्रेसचे राहुल गांधी यांच्या नावाची मोठी चर्चा आहे. त्यांच्या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्रामध्ये देखील राहुल गांधीच्या त्या रॅलीला जनतेचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. यासगळ्यात पुन्हा एकदा राहुल गांधी आणि भाजपच्या स्मृती इराणी हे एका वेगळया कारणासाठी चर्चेत आले आहेत.राहुल गांधी हे सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असणारे सेलिब्रेटी आहेत. देशभरात घडणाऱ्या अनेक घडामोडींवर देखील ते वेगवेगळया प्रकारे वक्तव्ये करत असतात. त्यांच्या एका व्टिटवर भाजपच्या वरिष्ठ नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना थेट आव्हान दिलं आहे. ते व्टिट हे सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. या दोन्ही नेत्यांच्या व्हायरल झालेल्या ट्विटवरुन नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहे.



त्याचे झाले असे की, स्मृती यांनी उत्तर प्रदेशातील कॉग्रेसचे नेते अजय राय यांनी लटके-झटके यावर दिलेली प्रतिक्रिया ही भाजपच्या नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे.त्यावरुनच इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्या ट्विटमध्ये इराणी म्हणतात, राहुलजी आपण घाबरलात तर नाही ना, तुम्हाला आता चँलेज आहे की, तुम्ही २०२४ मध्ये अमेठीमधूनच निवडणूक लढवावी. मला वाटतं हे आव्हान तुम्हाला मान्य असेल.इराणी यांच्या त्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे. अनेकांनी त्यावरुन दोन्ही नेत्यांवर केलेली टिप्पणीही लक्ष वेधून घेताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांची जनयात्रा त्याला मिळत असलेला प्रतिसाद आणि राहुल यांनी सभेतून केलेली भाषणे याची चर्चा जोरात सुरु आहे. त्यावर भाजपचे नेते सक्रिय झाले असून कॉग्रेसला थेट आव्हान करण्यात पुढाकार घेत असल्याचे दिसून आले आहे.राहुलजी मी असे ऐकले आहे की, तुमच्या पक्षातील काही नेते वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्यं करताना दिसत आहे. त्या नेत्यानं तुम्ही २०२४ मध्ये अमेठीमधून लढणार असल्याचे म्हटले आहे. तेव्हा मी हे फायनल समजू का....नाहीतर तुम्ही पुन्हा दुसऱ्या मतदारसंघात तर जाणार नाही ना, घाबरणार तर नाही ना...अशा प्रकारची प्रतिक्रिया इराणी यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने