मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा मंदावली, हिवाळी अधिवेशनात २१ विधेयके मांडली जाणार

मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील गावांबाबत केलेल्या विधानानंतर कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच काही दिवसांपूर्वी राज्य सरकारमधील दोन मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांनी बेळगावमध्ये जाणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, हा दौरा रद्द करण्यात आला. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी बेळगावला भेट दिली. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर खोचक शब्दात टीका केली आहे.



रोहित पवारांनी बेळगावात जाऊन घेतले ज्योतिबाचे दर्शन

रोहित पवार हे आज बेळगाव दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी बेळगाव शहरातील ज्योतिबा मंदिराचे दर्शन घेतले. मराठी भाषिकांच्या लढ्याला यश येऊन बेळगावसह संपूर्ण मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात समाविष्ट व्हावा, अशी प्रार्थनाही त्यांनी केली असल्याचे ते म्हणाले. याचे फोटोदेखील त्यांनी ट्वीट केले.

संजय राऊतांची खोचक टीका

दरम्यान, या ट्वीटवरून संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर खोचक शब्दात टीका केली आहे. राज्य सरकारचे मंत्री बेळगावात पोहोचले नाहीत. पण रोहित पवार बेळगावात पोहोचले. इच्छा आणि हिंमत असली की आडवे येणारे पळून जातात, असे ते म्हणाले.

नेमका काय आहे प्रकरण?

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगलीतील गावांवर दावा केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून राज्य सरकारचे दोन मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांनी बेळगावात जाणार असल्याचे जाहीर केले होते. बेळगावात जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांशी ते चर्चा करणार होते. मात्र, मंत्र्यांच्या या दौऱ्यावरून बोम्मई यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांनी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहीत मंत्र्यांच्या बेळगावात आल्यास कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा दिला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने