मोदी रोखणार भारत जोडो यात्रा! राहुल गांधींना सरकारने दिली वॉर्निंग

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहून राजस्थानमधून बुधवारी हरियाणात दाखल झालेल्या भारत जोडो यात्रेत कोविडच्या योग्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जात आहे की नाही याची काळजी घेण्यास सांगितले आहे.



कोविड नियमांचे पालन करणे शक्य नसेल तर 'सार्वजनिक आरोग्य आणीबाणी'ची परिस्थिती लक्षात घेऊन यात्रा थांबवावी, असे आरोग्यमंत्र्यांच्या पत्रात म्हटले आहे. या पत्रात आरोग्य मंत्रालयाने यात्रेत मास्क आणि सॅन्टिझरच्या वापरावर भर दिला असून लसीकरण झालेल्या लोकांनीच सहभागी व्हावे, असे सांगितले आहे.चीनमध्ये कोव्हिडच्या नवीन लाटेमुळे उद्भवलेल्या आरोग्याच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हे पत्र आले आहे. जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि अमेरिकेत कोव्हिड प्रकरणांमध्ये अशीच वाढ दिसून आली आहे, ज्यामुळे केंद्राने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पॉझिटिव्ह रुणांच्या नमुन्यांचे संपूर्ण जीनोम सिक्वेन्सिंग तयार करण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने