गावगुंड ते इंटरनॅशनल डॉन; कोण आहे गोल्डी ब्रार?

पंजाब: प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात काही महिन्यांनी एक वेगळं वळण आलं आहे. या खून प्रकरणातला आरोपी कुख्यात गुंड गोल्डी ब्रारला अटक करण्यात आली आहे. तो अमेरिकेतल्या कॅलिफॉर्नियामध्ये सापडला आहे. अनेक वर्षांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. पंजाबच्या गल्लीबोळात मोठा झालेला आणि आंतरराष्ट्रीय डॉन झालेला गोल्डी ब्रार कोण आहे? जाणून घ्या...

गोल्डी ब्रारचं मूळ नाव सतिंदरजीत सिंह असं आहे. तो सध्या ३४-३५ वर्षांचा आहे. त्याने वयाच्या अगदी लवकर या गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवलं. त्याचे वडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक होते. मुलाच्या वर्तनामुळे पंजाब पोलिसांनी त्यांनी पोलीस दलातून सक्तीची निवृत्ती दिली. गेल्या ४-५ वर्षांपासून गोल्डीने पंजाब, हरयाणा, दिल्ली अशा विविध भागांमध्ये आपला गुरू लॉरेन्स बिश्नोई याच्या सांगण्यानुसार दहशत पसरवली होती.




२९ मे २०२२ रोजी पंजाबमधल्या मनसा इथं दिवसा ढवळ्या पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची गोळ्या घालून हत्या झाली. यामध्ये गोल्डी ब्रारचा सहभाग होता. शिवाय, अपहरण, खंडणी, कॉन्ट्रॅक्ट किलींग, शस्त्रखरेदी, ड्रग्ज पुरवठा, अशा अनेक बेकायदेशीर कारवायांमध्ये गोल्डी ब्रारचा सहभाग आहे. या आधीही दोन पंजाबी कब्बडी खेळाडूंची हत्या, तसंच हिमाचल प्रदेशातल्या एका कोर्टाबाहेर झालेला गोळीबार या घटनांमध्येही गोल्डी ब्रारचं नाव आलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने