हत्ती-मानव समन्वयासाठी ‘एलिफंट अंकल’

कोल्हापूर: विशिष्ट स्थितीत हत्तींच्या वर्तणुकीवर त्याच्या स्वभावाचा अंदाज बांधण्याची कसब असलेले, हत्ती अभ्यासक आनंद शिंदे चं (Elephant expert Anand Shinde) दगड व आजरा तालुक्यातील हत्ती बाधित ५० गावांतील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.हत्ती व मानव यांच्यातील संघर्ष कमी करून समन्वयाचे वातावरण कसे तयार करता येईल, यासंदर्भाने ते मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, हत्तींशी संबंधित समस्या आणि त्यावरील उपाययोजना या अनुषंगाने ते शासनाला अहवाल सादर करणार आहेत. शिंदे यांनी केरळ येथे राहून हत्तींच्या वर्तनाचा अभ्यास केला आहे.



त्या आधारावर देशभरात अनेक ठिकाणी नियंत्रणाबाहेर गेलेल्या हत्तींशी विशिष्ट पद्धतीने संवाद साधून, त्यांच्याशी जवळीकता करून त्यांना कह्यात आणण्यात यश मिळवले. त्यामुळेच त्यांना एलिफंट अंकल असेही संबोधले जाते.चंदगड व आजरा तालुक्यात हत्तींचा वावर सुरू होऊन दोन दशके होत आहेत. या कालावधीत इथल्या शेतकऱ्याने त्याला स्वीकारले असले तरी पिकांचे व अन्य मालमत्तेचे होणारे नुकसान पाहता अजूनही मनात तिरस्काराची भावना आहे.

ज्या भागात हत्तीचा सातत्याने वावर आहे तिथे तर त्याची तीव्रता अधिक आहे. मुळात हत्ती नियंत्रणाबाहेर का जातो, याचे काही ठोकताळे आहेत. त्याबाबत सर्वसामान्य माणूस जाणकार झाला, तर हत्तीच्या वर्तनात सुधारणा करण्याच्या दिशेने त्याची पावले पडू शकतात.शिंदे यांच्याकडून याचेच मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याचबरोबर या दौऱ्यात शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या सूचना ते शासनापर्यंत पोहचवणार आहेत. राज्य शासनाने त्यांना अभ्यासासाठी चार महिन्यांसाठी नियुक्त केले आहे.

या गावांत साधणार संवाद

चंदगड तालुका : जांबरे, उमगाव, नागवे, सावतवाडी, न्हावेली, खळणेकरवाडी, हेरे, वाघोत्रे, खालसा गुडवळे, खामदळे, इसापूर, कानूर खुर्द, भोगोली, बिजूर, पिळणी, पाटणे, पार्ले, कळसगादे, नगरगाव, कलिवडे, किटवडे, शेवाळे, जेलुगडे, जंगमहट्टी, हाजगोळी, तुडीये, माडवळे, ढेकोळी, सुरुते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने