महिलेच्या खात्यात आले 270 कोटी; तिने इमानदारी दाखवली अन्...

 नवी दिल्लीः एका महिलेल्या बँक खात्यामध्ये अचानक एक-दोन नव्हे तर तब्बल २७० कोटी रुपये आले. पुढे काय झालं, तेसुद्धा आश्चर्यकारक आहे. कारण ही गोष्ट जुनी असली तरी आज पुन्हा जगभर तिची चर्चा होतेय.रुथ बैलुन असं या नशिबवान महिलेचं नाव आहे. २०१९मध्ये तिच्या खात्यामध्ये २७० कोटी रुपये आले होते. तेव्हा ती अमेरिकेच्या टेक्सासमध्ये असलेल्या बुटांच्या दुकानामध्ये काम करीत होती.



या घटनेला आता दोन वर्षांपेक्षा जास्तीचा कालावधी लोटला. जेव्हा तिच्या खात्यामध्ये एवढी मोठी रक्कम आली तेव्हा तिने इमानदारी दाखवत ते पैसे माघारी केले.रुथने आता एक कंपनी सुरु केली आहे. ती मुलांसाठी खास मनोरंजनाचे कार्यक्रम करते, शिवाय मुलांसाठी पार्टीचं आयोजन करतो. या बिझनेसमध्ये तिची मैत्रिण इवा ब्रांडेस पार्टनर आहे. या कंपनीमुळे ती चर्चेत आली आहे.

जेव्हा तिच्या खात्यामध्ये २७० कोटी रुपये आले तेव्हा तिने तातडीने बँकेशी संपर्क साधला. बँकेने ही चूक झाल्याचं सांगितलं. रुथने ते पैसे कसलीही कटकट न करता माघारी केले.आचा रुथची स्टोरी माध्यमांमधून पुन्हा झळकत आहे. व्हायरल होत असलेल्या या स्टोरीमुळे जगभरात तिचं कौतुक होतंय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने