भारतीय ड्रायव्हरचं रातोरात नशीब फळफळलं; दुबईत लागली तब्बल 33 कोटींची लॉटरी!

दुबई: दुबईतील भारतीय वंशाचा व्यक्ती 'जॅकपॉट'मध्ये रातोरात करोडपती झालाय. आपला विश्वास बसत नाही ना? पण, हे खरं आहे. भारतीय व्यक्तीनं अमिरातीमध्ये 'लकी ड्रॉ'त  15 दशलक्ष दिरहमची (33 कोटी रुपये) लॉटरी जिंकलीये.जॅकपॉट जिंकल्यानंतर तो म्हणाला, 'मला अजूनही यावर विश्वास बसत नाहीये. चार वर्षांपूर्वी मी नोकरीच्या शोधात भारतातून दुबईत आला होतो, तेव्हापासून मी एका फर्ममध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत आहे. महिन्याला मला 3200 इतका पगार मिळतो.'



'मला अजूनही विश्वास बसत नाही'

अजय ओगुलानं  दुबईतील एमिरेट्स ड्रॉमध्ये  15 दशलक्ष दिरहमचं (33 कोटी) बक्षीस जिंकलंय. लॉटरी बक्षीस जिंकल्यानंतर ओगुला पुढं म्हणाला, 'मला अजूनही विश्वास बसत नाही की मी जॅकपॉट मारला आहे.'UAE दैनिक खलीज टाईम्सनं अजय ओगुलाच्या हवाल्यानं म्हटलंय की, दक्षिण भारतातील एका छोट्या गावात राहणारा ओगुला चार वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात यूएईला आला होता. सध्या एका ज्वेलरी फर्मसाठी ड्रायव्हर म्हणून तो काम करत आहे. त्याला महिन्याला 3,200 रुपये पगार दिला जातो, असं खलीज टाईम्सनं वृत्त दिलंय.


'जिंकलेल्या रकमेतून चॅरिटी ट्रस्ट उघडणार'

ओगुला म्हणाला, या रकमेतून मी माझा चॅरिटी ट्रस्ट उघडणार आहे. त्यामुळं माझ्या गावात आणि आजूबाजूच्या गावातील अनेक लोकांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास मदत होईल. जेव्हा मी ही बातमी माझ्या आई आणि भावंडांना सांगितली, तेव्हा माझ्या बोलण्यावर कोणी विश्वासच ठेवायला तयार नव्हतं. दरम्यान, याच ड्रॉमध्ये 50 वर्षीय ब्रिटिश महिला पॉला लीचनं 77,777 बक्षीस जिंकलंय. ही महिला 14 वर्षांपासून यूएईमध्ये मानव संसाधन व्यावसायिक म्हणून काम करत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने