शब्दांवाचून कळले सारे…विराटचं ऐतिहासिक शतक अन् अनुष्काची Insta Story… पतीसाठी अनुष्काने पोस्ट केला ‘तो’ फोटो चर्चेत

मुंबई: भारतीय क्रिकेट चाहते मागील तीन वर्षांपासून ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण अखेर बांगलादेशविरुद्धच्या तिसरा एकदिवसीय सामन्यामधील पहिल्या डावामधील ३९ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर प्रत्यक्षात अवतरला. इबादत हुसैनने विराट कोहलीच्या पायावर टाकलेला चेंडू विराटने मनगटांचा वापर करुन अलगद शॉर्ट फाइन लेगला टोलला आणि चेंडू थेट सीमेपार जाऊन स्थिरावला. पंचांनी षटकार दर्शवणारा इशारा केला अन् हा षटकार क्रिकेटच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी कोरला गेला. यामागील कारण म्हणजे विराटने हा षटकार मारला तेव्हा तो ९७ धवांवर खेळत होता. या षटकारासहीत त्याने एकदिवसीय क्रिकेटमधील आपलं ४४ वं आणि एकंरदित ७२ वं शतकं साजरं केलं. या शतकी खेळीनंतर सोशल मीडियावरुन विराटवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मानेही इन्स्ताग्रामवरुन एक खास पोस्ट केली आहे.



पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शिखर धवन आठ चेंडूंमध्ये तीन धावा करुन बाद झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या विराट कोहली आणि इशान किशनने २९० धावांची भागीदारी केली. यादरम्यान इशानने १३१ चेंडूंमध्ये २४ चौकार आणि १० षटकांच्या मदतीने इशानने २१० धावा केल्या. इशानला उत्तम साथ देणाऱ्या विराटनेही आपलं ७२ वं शतक साजरं केलं.विशेष म्हणजे हे दोघेही टी-२० क्रिकेटप्रमाणे वेगाने खेळत होते. त्यामुळेच विराटनेही ९१ चेंडूंमध्ये ११३ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ११ चौकार आणि दोन षटकार लगावले. यापैकी एक षटकार तर त्याने एक षटकार त्याने ९७ धावांवर असताना लागवला. ८३ चेंडूंमध्ये विराटने शतक झळकावलं. विराटने या शतकासहीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. सध्या विराटच्या पुढे या यादीमध्ये केवळ १०० शतकांचा विक्रम नावावर असणारा सचिन तेंडुलकरच आहे.

विराटने या षटकारासहीत रिकी पॉण्टींगचा ७१ शतकांचा विक्रम मोडीत काढला. विराटच्या शतकानंतर अनुष्काने टीव्हीवर विराट हसत हसत बॅट उंचावून शतकाचा आनंद साजरा करत असतानाच्या क्षणाचा फोटो पोस्ट केला आहे. भिंतीवर लटकवलेल्या वॉल माऊंटेड टीव्हीवर सामाना पाहताना काढलेल्या या फोटोत विराट हसताना दिसतोय.या फोटोवर अनुष्काने दोन हृदयाच्या इमोंजीमध्ये १०० असा आकडा लिहिला आहे. या शिवाय अनुष्काने या पोस्टमध्ये काहीही लिहिलेलं नाही. मात्र २०१९ नंतर थेट २०२२ च्या शेवटच्या महिन्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक साजरं करणाऱ्या पतीचं अनुष्काने या इन्स्टास्टोरीच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने अभिनंदन केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने