वाढत्या रूग्णसंख्येत अदर पुनावालांचं भारतीयांसाठी मोठं विधान; म्हणाले...

मुंबई :भारताचा शेजारी राष्ट्र चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने हाहाकार माजवण्यास सुरूवात केली आहे. चीनमधील वाढत्या रूग्ण संख्येच्या पार्शवभूमीवर भारतासह अनेक देशांनी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे.दरम्यान, चीनमधील वाढत्या रूग्णसंख्येत कोविशील्ड लस निर्माते अदर पुनावालांनी ट्वीट करत मोठं विधान केले आहे. पुनावाला म्हणाले की, चीनमध्ये कोरोनाची संख्या पुन्हा एकदा वाढणे चिंताजनक आहे. मात्र, कोरोना विरोधातील भारतात झालेले लसीकरण आणि ट्रॅक रेकॉर्ड लक्षात घेता वाढत्या रूग्णसंख्येत भारतीयांनी अजिबात घाबरून जाण्याची गरज नाहीये. परंतु, केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर विश्वास ठेवून त्याचे पालन करणे आवाहन पुनावाला यांनी नागरिकांना केले आहे.दरम्यान, काही देशांमध्ये कोविड-19 प्रकरणांची वाढती संख्या पाहता, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सर्व कोविड-पॉझिटिव्ह प्रकरणांचे नमुने INSACOG लॅबमध्ये पाठवण्यास सांगितले आहे.

कोरोना अद्याप संपलेला नाही

चीनमधील वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि आरोग्य विभागाची बैठक पार पडली. यावेळी कोरोना अद्याप संपलेला नाही, असं मोठं विधान केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर केलं आहे. यासंदर्भात सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेशही आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. 





चीनमधील नव्या व्हेरियंटी चर्चा

दरम्यान, बैठकीबाबत नीती आयोगाचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की, कोरोनाच्या जागतीक परिस्थितीवर आज केंद्रीय मंत्री आरोग्य मंत्र्यांच्या उपस्थित चर्चा झाली. कोरोनाच्या बाबतीत आपण सतर्क आहोत. चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. या बैठकीत चीनच्या नवीन व्हेरिअटची चर्चा झाली. भारतातील सर्व रुग्णालातील न्युमोनियाच्या रुग्णांची योग्य तपासणी केली जाईल. यासंदर्भात प्रत्येक आठवड्यात बैठक होईल.

नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी?

लक्षणं असतील तर कोरोना टेस्ट करा. ज्यांनी प्रतिबंधात्मक डोस घेतला नसेल तर त्यांनी डोस घ्यावा, गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावा, असं आवाहनही आरोग्य मंत्र्यांकडून करण्यात आलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने