संजय राऊत म्हणजे चीनचे एजंट; सीमावादावरून मुख्यमंत्र्यांनी राऊतांना ठरवलं 'देशद्रोही'

बेळगांव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद  आता चांगलाच उफाळून आलाय. त्यातच आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई  यांनी पुन्हा एकदा चिथावणीखोर वक्तव्य केलंय, त्यामुळं हा वाद आता चांगलाच पेटणार असल्याचं दिसतंय.मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील गावांवर दावा केल्यानंतर सीमवादावरून ठिणगी पडली. त्यानंतर महाराष्ट्रातील नेत्यांनी केंद्र सरकारनं सीमाप्रश्नी मध्यस्ती करावी, अशी मागणी केली होती. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मध्यस्तीनंतर दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून हा प्रश्न सामोपचारानं सोडवण्याचा त्यांनी सल्ला दिला.



त्यानंतरही बोम्मईंनी कर्नाटक विधानसभेत  महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही, असं चिथावणीखोर वक्तव्य केलं. सीमावादावर वादग्रस्त वक्तव्य करत असतानाच बसवराज बोम्मईंनी खासदार संजय राऊत यांना थेट देशद्रोही करून टाकलंय. त्याचबरोबर संजय राऊत म्हणजे चीनचे एजंट असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. बोम्मईंच्या वक्तव्यानंतर आज संजय राऊत यांनी बोम्मईंनी अटक केली, तरी आम्ही बेळगावात जाऊ असं म्हटलंय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने