कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनाला जाताय? मग, 'हा' नियम पाळावाच लागेल!

कोल्हापूर: जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील, चीन आणि अमेरिकेत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. कोरोनानं पुन्हा डोकं वर काढल्यानं चिंता वाढल्या आहेत. चीनमध्ये कोरोनानं पुन्हा एकदा कहर सुरु केला आहे, त्यामुळं मृतांचा आकडा वाढत आहे.देशात विमानतळांवर नियमावली लागू करण्यात आल्यानंतर आता मंदिरांनाही अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरातील  कर्मचाऱ्यांना मास्क  सक्ती करण्यात आली असून, शिर्डीतील साईबाबा  मंदिरात भाविकांना मास्क वापरण्यासह सोशल डिस्टन्सिंगचं नियम पाळण्याचं आवाहन करण्यात आलंय.



याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडूनही राज्य शासनाला सतर्कतेचे आदेश देण्यात आल्यानंतर कोल्हापूर विमानतळ प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधक नियमावलीची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झालीये.दरम्यान, देश-विदेशातील हजारो भाविक, पर्यटक दररोज करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येत असल्यामुळं कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रथम मंदिरातील कर्मचाऱ्यांना मंदिरात मास्क वापरण्याच्या सूचना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून देण्यात आल्या आहेत, तर भाविकांसाठी अजून कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांनी सांगितलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने