“काय फेअर, काय अनफेअर…” ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडलेल्या अमृता देशमुखची पहिली पोस्ट

 मुंबई : छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत असलेला कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ मराठीला ओळखले जाते. इतर पर्वांप्रमाणेच ‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्वही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. यंदाचे पर्व हे पहिल्या दिवसांपासूनच चर्चेत आहेत. बिग बॉसच्या या शोमध्ये येत्या आठवड्यात दोन सदस्य घराबाहेर जाणार असल्यामुळे मोठा ट्विस्ट आला होता. विकास सावंत शनिवारी (१७ नोव्हेंबर) बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला. त्यानंतर आता पुण्याची टॉकरवडी अमृता देशमुख हिचाही प्रवास संपुष्टात आला आहे. यानंतर तिने एक पोस्ट केली आहे.



अमृता देशमुख हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिला सपोर्ट करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. यावेळी तिने एक पोस्ट शेअर करत सर्वांचेच मनापासून आभार, असे म्हटले आहे.दरम्यान ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपल्याने अमृताला खेळातून बाहेर पडावे लागेल. सुरुवातीच्या दिवसांत अमृताचा घरातील वावर फार कमी होता. पण नंतर तिने स्वत:ला सिद्ध करत खेळ खेळायला सुरुवात केली होती. टास्कदरम्यानही तिची आक्रमकता दिसून आली होती. पहिल्या आठवड्यापासून प्रत्येक नॉमिनेशन टास्कमध्ये अमृताला घरातील सदस्यांनी नॉमिनेट केलेलं पाहायला मिळालं. आता विकास व अमृता घरातून बाहेर पडल्यानंतर खेळात टिकून राहण्यासाठी स्पर्धकांना नवे डावपेच व आणखी तल्लख बुद्धीने खेळ खेळावा लागणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने