पराभवानंतर फ्रान्समध्ये राडा, चाहत्यांनी जाळल्या गाड्या, पोलिसांना...

फ्रान्स:अर्जेंटिनाने अंतिम फेरीत फ्रान्सचा पराभव करून फिफा विश्वचषक 2022 चे विजेतेपद पटकावले. पेनल्टी शूटआऊटपर्यंत गेलेल्या या सामन्यात अर्जेंटिनाने 4-2 असा विजय मिळवला. अंतिम फेरीतील पराभवानंतर फ्रान्समधील चाहत्यांचा संयम सुटला असून देशाच्या विविध भागात दंगलीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.अर्जेंटिनाच्या हातून झालेल्या पराभवानंतर पॅरिसमध्ये भीषण हिंसाचार झाला आणि चाहत्यांनी वाहनांची तोडफोड करून जाळपोळ केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.फिफा विश्वचषक फायनलसाठी फ्रान्सच्या विविध शहरांमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. येथे मोठ्या पडद्यावर विश्वचषकाचा अंतिम सामना पाहिला जात होता, दरम्यान सामन्याचे वातावरण तापले आणि फ्रान्स हरल्यानंतर चाहत्यां वाहनांची तोडफोड केली.मात्र पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सला पराभवाला सामोरे जावे लागताच परिस्थिती अनियंत्रित झाली आणि वेगवेगळ्या शहरांतून हिंसाचाराच्या बातम्या आल्या. पॅरिसशिवाय लायनमध्ये पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, इथेही चाहत्यांनी वाहने पेटवली होती.




फ्रान्सच्या वेगवेगळ्या शहरांमधून काही व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत, ज्यात लोक गाड्यांची तोडफोड करताना आणि त्यांना आग लावताना दिसत आहेत. पॅरिसमध्ये आधीच मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते, मात्र त्याचा कोणताही परिणाम दिसून आला नाही. कारण लाखो चाहते रस्त्यावर उतरले होते आणि अंतिम फेरीतील पराभवानंतरच ते अनियंत्रित झाले होते.फिफा विश्वचषक फायनमध्ये कतारमधील लुसेल स्टेडियमवर झालेल्या या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा 4-2 असा पराभव केला. या सामन्याचा निर्णय पेनल्टी शूटआऊटमधून झाला. सामन्याची नियोजित वेळ संपली तेव्हा स्कोअर 3-3 होता, फ्रान्ससाठी या सामन्यात एमबाप्पेने हॅट्ट्रिक केली तर लिओनेल मेस्सीने दोन गोल केले. अर्जेंटिनाने हा विश्वचषक पेनल्टी शूटआऊटमध्ये जिंकला आणि 36 वर्षांचा दुष्काळ संपवला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने