शिंदे अन् फडणवीसांना अमित शाहांनी गुंगीचं इंजेक्शन दिलंय - संजय राऊत

मुंबई: कर्नाटक महाराष्ट्र सीमावादाचा प्रश्न सध्या चांगलाच तापला आहे. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा उचलून धरण्यात आला. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकारवर कठोर टीका केली आहे.माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "बोम्मई काय म्हणतात, त्यापेक्षा महाराष्ट्र काय म्हणतो, हे महत्त्वाचं आहे. अमित शाहांनी मध्यस्थी केली, असं आपले मुख्यमंत्री म्हणतात, पण मध्यस्थी केली म्हणजे काय केलं? एवढं होऊनही बोम्मई तशीच भाषा वापरतायत. तुम्ही त्याला काही उत्तर देणार आहात की नाही? इतर कोणत्याही राज्याने महाराष्ट्राची इतकी बेअब्रू केली नव्हती. एकमेकांशी कायम आदरभाव ठेवून होते."



राऊत पुढे म्हणाले, "कर्नाटकातही भाजपाचे मुख्यमंत्री आहेत, राज्यातही भाजपाचे मुख्यमंत्री आहे. पण तरीही बोम्मई महाराष्ट्राच्या कानफाटात मारतात आणि मुख्यमंत्री गाल चोळत विधानसभेत जातात. भुजबळ साहेबांसोबत आम्ही तुरुंगात गेलो होतो सांगतात, अरे मग दाखवा ना लाठ्या खाल्लात ते. आता तर तुम्ही सत्तेवर आहात, मुख्यमंत्री आहात.. मग भूमिका घ्यायला हवी ना. भूमिका घेत नसाल तर, त्या पदावर राहणं योग्य नाही. "

दिल्लीत गेल्यावर अमित शाहांनी गुंगीचं औषध दिलंय असं सांगताना संजय राऊत म्हणाले, "स्वतःवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर तासभर उत्तर देता, मगा सीमाप्रश्नाबद्दल बाजूचा मुख्यमंत्री अपमान करतो, मग का बोलत नाही? तोंडात कोणी बोळा कोंबला का? दिल्लीत गेला तेव्हा अमित शाहांनी तुम्हाला गुंगीचं इंजेक्शन देऊन पाठवलंय का की तुम्ही बोलत नाही. तुम्ही ग्रामपंचायतीचे हिशोब दाखवताय, अरे तिकडे गावं चाललीयेत ते बघा. इतकं विकलांग राज्य कधीच झालं नव्हतं."

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने