मोदींच्या फोनला दिली नाही किंमत, तिकीट नाकरलेला उमेदवार आज ठरतोय अडचण

हिमाचल प्रदेश : भाजपकडून तिकीट न मिळाल्याने कृपाल परमार यांनी हिमाचल प्रदेशातील फतेहपूर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आहे. भाजपनेही त्यांच्या बंडखोरीवर कारवाई करत त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. भाजपच्या नेत्यांनी कृपाल परमार यांची खूप समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कोणाचेही ऐकले नाही. आपल्याच पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत. दुसरीकडे भाजपने यावेळी वनमंत्री राकेश पठानिया यांना रिंगणात उभे केले आहे. तर काँग्रेसने सुजानसिंग पठानिया यांचे पुत्र आणि विद्यमान आमदार भवानी पठानिया यांना उभे केले आहे.



निवडणुकीदरम्यान पीएम मोदींच्या कथित कॉलचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. पंतप्रधानांनी कृपाल परमार यांना फोन करून फतेहपूर मतदारसंघातून निवडणूक लढवू नका, असे सांगितले होते. मात्र, कृपाल परमार यांनी त्यांचेही ऐकले नाही आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरले. संवादादरम्यान कृपाल परमार यांनी जेपी नड्डा यांच्याबाबत पंतप्रधानांकडे तक्रार केल्याचेही सांगण्यात आले आहे. त्याचवेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही राकेश पठानिया यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान कृपाल परमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता.

हिमाचलचे ज्येष्ठ नेते कृपाल परमार आणि पंतप्रधान यांचे नाते जवळपास अडीच दशके जुने आहे. नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशचे प्रभारी असल्यापासून दोघेही एकमेकांना ओळखतात. कृपाल परमार हे भाजपचे माजी खासदार आहेत. परमार (६३) हे गेल्या वर्षीपासून भाजपमध्ये नाराज आहेत, जेव्हा पक्षाने त्यांना पोटनिवडणुकीत तिकीट नाकारले होते. ते आपले शालेय मित्र आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यावर स्वतःचा अपमान केल्याचा आरोप करत आहे.2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने कृपाल सिंह परमार यांना फतेहपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यांना काँग्रेसच्या सुजानसिंग पठानियाकडून केवळ 1,284 मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. त्याचबरोबर, 2021 च्या पोटनिवडणुकीत पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. मात्र, भाजपमधून आलेल्या बलदेव ठाकूर यांनाही 5789 मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने