कोचर दाम्पत्य, ICICI अन् व्हिडिओकॉनचं नेमकं प्रकरण काय?

मुंबई: व्हिडीओकॉन ग्रुपला ३ हजार २५० कोटींचं कर्ज आणि त्यातीस अनियमिततेचा ठपका ठेवलत आयासीआयासीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटके केली होती.त्यानंतर आज व्हिडिओकॉनचे चेअरमन वेणुगोपाल धूत यांना सीबीआयने अटक केली आहे. चंदा कोचर, आयसीआयसीआय आणि व्हिडिओकॉनमधील हे प्रकरण नेमकं काय आहे. याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.चंदा कोचर यांच्यावर बँकेच्या आचारसंहितेचं उल्लंघन आणि हितसंबंधांसाठी व्यवहार केल्याचे काही आरोप ठेवण्यात आले आहेत. पदांचा गैरवापर करत मर्जीतल्या लोकांचा आर्थिक फायदा केल्याचाही त्यांच्या आरोप आहेत.



चंदा कोचर, आयसीआयसीआय आणि व्हिडिओकॉन वाद नेमका काय?

ICICI बँकेने धूत यांच्या व्हिडिओकॉन समूहाला 3,250 कोटी रुपयांचं कर्ज दिले होते. याशिवाय कर्जाखाली दबलेल्या व्हिडिओकॉन समूहाला 20 बँका आणि काही आर्थिक संस्थांनीदेखील 40 हजार कोटी रुपये कर्ज म्हणून दिले होते.दरम्यान, ऑक्टोबर 2016 मध्ये धूत यांच्या समूहातील गुंतवणूकदार अरविंद गुप्ता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहित ICICI बँकेच्या कामकाजावर संशय व्यक्त केला होता. तसेच व्हिडिओकॉनला देण्यात आलेल्या कर्जामागे हितसंबंधांचा गैरवापर होत असल्याचही शक्यता व्यक्त करण्या आली होती.

2012 मध्ये, चंदा कोचर यांच्या नेतृत्वाखालील ICICI बँकेने व्हिडिओकॉन समूहाला 3,250 कोटींचे कर्ज दिले आणि सहा महिन्यांनंतर वेणुगोपाल धूत यांच्या मालकीच्या मेसर्स सुप्रीम एनर्जीने मेसर्स न्यूपॉवर रिन्युएबल्सला 64 कोटींचे कर्ज दिले. ज्यात दीपक कोचर यांचा ५०% हिस्सा आहे. आयसीआयसीआय बँकेकडून देण्यात आलेले हे कर्ज नंतर एनपीए झाले आणि नंतर या प्रकरणाला "बँक फ्रॉड" असे म्हटले गेले. त्यानंतर सप्टेंबर 2020 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने दीपक कोचर यांना अटक केली होती.2012 मध्ये, चंदा कोचर यांच्या नेतृत्वाखालील ICICI बँकेने व्हिडिओकॉन समूहाला 3,250 कोटींचे कर्ज दिले आणि सहा महिन्यांनंतर वेणुगोपाल धूत यांच्या मालकीच्या मेसर्स सुप्रीम एनर्जीने मेसर्स न्यूपॉवर रिन्युएबल्सला 64 कोटींचे कर्ज दिले. ज्यात दीपक कोचर यांचा 50 % हिस्सा आहे.

आयसीआयसीआय बँकेकडून देण्यात आलेले हे कर्ज नंतर एनपीए झाले आणि नंतर या प्रकरणाला "बँक फ्रॉड" असे म्हटले गेले. त्यानंतर सप्टेंबर 2020 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने दीपक कोचर यांना अटक केली होती.दरम्यान, धूत यांच्या कंपनी व्हिडिओकॉनला आयसीआयसीआय बँकेकडून 3250 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आणि त्या बदल्यात धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या नुपॉवर या पर्यायी ऊर्जा कंपनीमध्ये पैसे गुंतवल्याचाही आरोप आहे.2019 मध्ये न्यायमूर्ती बी.एन. श्रीकृष्ण समितीचा अहवाल आला. ज्यामध्ये कोचर यांनी व्हिडिओकॉनला कर्ज देताना बँकेच्या आचारसंहितेचा भंग केल्याचे समितीच्या चौकशीत आढळून आले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने