'खरं सांग तू...' तो प्रश्न अन् रश्मिका लाजली! श्रीवल्लीला काय बोलावं कळेना

मुंबई: भलेही रश्मिका ही टॉलीवूडची अभिनेत्री असेल मात्र तिला बॉलीलवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळाली आहे. पुष्पामध्ये तिनं साकारलेली श्रीवल्ली ही प्रेक्षकांच्या काळजात घर करुन आहे. सध्या रश्मिका ही एका वेगळयाच कारणासाठी चर्चेत आली आहे.सोशल मीडियावर रश्मिकाला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. रश्मिकानं शेयर केलेले फोटो पाहणे हे तिच्या चाहत्यांसाठी वेगळी पर्वणी असते. पुष्पामध्ये हिट झाल्यानंतर रश्मिकाला बॉलीवूडचे देखील दरवाजे उघडले गेले. तिला मोठमोठ्या सेलिब्रेटींसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. चाहत्यांना रश्मिकाविषयी नेहमीच उत्सुकता असते.





रश्मिका ही मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. तेव्हा फोटोग्राफर्सचा तिला गराडा पडला होता. तिची एक छबी टिपण्यासाठी फोटोग्राफर्सनं मोठी गर्दी केली होती. अशातच तिला एका पापाराझ्झीनं विचारलेला तो प्रश्न यावर रश्मिकाला काय बोलावं हे कळेना. त्या प्रश्नावर उत्तर देताना ती लाजली. तो फोटोही सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसतो आहे. याउलट रश्मिकानं देखील पापाराझ्झींना प्रश्न विचारला होता.

रश्मिकानं आपल्यावर सतत होणारा कॅमेऱ्यातून होणारा लखलखाट पाहता तिनं पापाराझ्झींना थेट प्रश्न विचारला. ती म्हणाली, तुम्ही झोपता की नाही, यावर त्यांनी सांगितलं की, तुम्ही इतक्या सुंदर आहात की आम्हाला झोप येत नाही. रश्मिकानं ब्लॅक रंगाचा टी शर्ट आणि ऑफ व्हाईट रंगाचा शर्ट परिधान केला होता. तुम्हाला झोप कशी येत नाही असा प्रश्न तिनं विचारला होता.रश्मिकाचा तो प्रश्न ऐकून एक जण म्हणाला ते झोप झाल्यावर पुन्हा फोटो काढण्यासाठी येतात. हे सगळं होत असताना फोटोग्राफर्सनं श्रीवल्लीला तू खरचं खूप सुंदर आहेस यावर काय सांगशील असा प्रश्न विचारला. त्यावर ती लाजली आणि हसत निघून गेली. त्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने