'चीनला आपला शत्रु म्हणू नका! आपले शिपाईही तेच करतात'

मुंबई : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक डॉ.भालचंद्र नेमाडे हे नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे साहित्यिक आहेत. आपल्या वक्तव्यांमुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली आहे. मात्र मतांवर ठाम राहून जे सत्य ते बोलणारच अशी भूमिका नेमाडेंनी नेहमीच घेतली आहे.गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन यांच्यातील प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे देशातील वातावरण चिघळले गेले आहे. चीन आणि भारत सीमेवरील वातावरणही अशांत झाल्यानं त्याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. विशेषत सोशल मीडियावर भारत आणि चीन विषयी नेटकऱ्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. यासगळ्यात प्रसिद्ध लेखक कोसलाकार नेमाडेंच्या प्रतिक्रियेनं पुन्हा एकदा भारत आणि चीनच्या चर्चेला तोंड फुटल्याचे दिसून आले आहे.



जळगाव मध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये नेमाडे बोलत होते. त्यांनी दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. नेमाडेंची ती प्रतिक्रिया व्हायरल होताच त्यांच्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ते म्हणाले, आपण चीनला शत्रु म्हणतो आहोत हे चुकीचे आहे. ते देखील आपले आहेत. त्यामुळे चीनला दोष देणे चुकीचे आहे. ज्यांना निवडून दिले आहे त्यांनी तो प्रश्न चुकीच्या पद्धतीनं मार्गी लावला आहे.भारत चीन हा प्रश्न कसा सोडवता येईल याचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. ज्या राज्यकर्त्यांना आपण निवडून दिले आहे त्यांच्यामुळे वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे लोकांनी देखील त्यांच्या कर्माची फळं भोगावीत. आपले शत्रु युद्ध करतात गोळ्या घालतात त्यांचे सैनिक देखील तेच करतात. त्यात फरक काही नाही. अशा शब्दांत नेमाडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने