गुजरातमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता! प्राथमिक निकालानंतर राजनाथ सिंह यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले “विजयाचे आम्हाला नवल नाही, कारण…”

गुजरात :  गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल काही क्षणात स्पष्ट होणार आहेत. सध्या मतमोजणी सुरू असून या निकालाचे प्राथमिक अंदाज समोर आले आहेत. गुजरात राज्यात पुन्हा एकदा भाजपा पक्षाची सत्ता येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी काँग्रेसचे संख्याबळ कमी होण्याची शक्यता आहे. यावरच केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गुजरातमधील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खूप विश्वास ठेवते. आमचाच विजय होणार याची आम्हाला कल्पना होती. त्यामुळे या निकालाचे आम्हाला नवल वाटत नाही, असे राजनाथ सिंह म्हणाले.



गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबर रोजी एकूण दोन टप्प्यांत मतदान पार पडले. आज प्रत्यक्ष मतमोजणी होत आहे. मात्र या निवडणुकीत भाजपा पक्ष नेत्रदीपक कामगिरी करताना दिसतोय. गुजरातध्ये सध्या भाजपा १४७ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस फक्त १० जागांवर पुढे आहे. आम आदमी पार्टीचे ९ उमेदवार आघाडीवर आहेत. या प्राथमिक निकालांनुसार येथे भाजपा एकहाती सत्ता स्थापन करण्याची दाट शक्यता आहे. तर या निवडणुकीत गुजरातमधील जनतेने काँग्रेसला नाकारल्याचे समोर आले आहे. विशेष बाब म्हणजे या निवडणुकीच्या माध्यमातून आप पक्ष गुजरात राज्यात प्रवेश करत आहे.

राजनाथ सिंह काय म्हणाले?

गुजरात राज्यात विजयाची शक्यता असल्यामुळे भाजपाच्या गोटात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. यावर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्हाला या निकालाचे नवल वाटत नाहीये. गुजरातमधील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खूप विश्वास ठेवते. गुजरातमध्ये सत्ताविरोधी लाट नव्हतीच. उलट येथील मतदार सत्ताधारी पक्षाच्या बाजूने होते. गुजरातमध्ये सध्या नवा विक्रम स्थापित होत आहे. आम्हाला याची अगोदरच कल्पना होती,” असे राजनाथ सिंह म्हणाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने