बिग बॉसमध्ये राडा! अर्चनानं विकासवर टाकलं गरम पाणी

मुंबई : साऊथची सनी लियोनी म्हणून जिच्या नावाचा उल्लेख केला जातो त्या अर्चना गौतमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तिला राग आल्यानंतर तिनं जे काही केलं त्यामुळे तिला नेटकऱ्यांनी तिच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.अर्चनाला राग अनावर झाला आणि तिनं चहासाठी जे गरम पाणी ठेवले होते तेच विकासच्या अंगावर टाकले. त्यामुळे विकासनं देखील तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केी आहे. ते पाणी प्रियंकाच्या अंगावर सांडले आहे. प्रियंकानं अर्चनाला तू वेडी आहेस का, काहीही काय करतेस, असा प्रश्न तिला विचारला आहे.



सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. येत्या एपिसोडमध्ये बिग बॉसमध्ये काय घडलं आहे याची कल्पना तो व्हिडिओ पाहिल्यानंतर येते. त्यावर नेट्कऱ्यांनी अर्चनाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. दरवेळी अर्चना तुझी मनमानी चालणार नाही. बिग बॉस आता अर्चनाला कडक शब्दांत समज देण्याची वेळ आली आहे. अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.यापूर्वी देखील अर्चना गौतमनं शिव ठाकरेशी पंगा घेतला आहे. ज्यामध्ये तिनं शिव ठाकरेचा गळा दाबला होता. त्यानंतर तिला बिग बॉसनं शोच्या बाहेर काढलं होतं. मात्र सलमाननं तिला पुन्हा शो मध्ये आणलं होतं. तिनं माफी मागत आपली चूक झाल्याचे म्हटले होते. आपण पुन्हा असे वागणार नाही हे तिनं म्हटलं होतं.

अर्चना ही नेहमीच कुणाशी ना कुणाशी भांडताना दिसते. बिग बॉसमधील तिचे बाकी सहकारी तिला वैतागले आहेत. विशेष म्हणजे बिग बॉसनं सांगितल्यानंतर देखील ती काही ऐकायला तयार नसते. एवढा तिचा मोठा दरारा आहे. आता तर तिनं विकासवर गरम पाणी टाकून वेगळाच वाज ओढून घेतला आहे. आता सलमान तिला काय शिक्षा देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने