'मविआ' नेते बेळगाव सीमेवर दाखल; आंदोलक आणि पोलिसांमध्ये राडा

बेळगावः महाराष्ट्र-कर्नाटक वाद पेटलेला असून आज महाविकास आघाडीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली बेळगावमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. सध्या हे नेते बेळगावच्या सीमेवर दाखल झाले आहेत.बेळगावच्या सीमेवर कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राच्या नेत्यांना अडवलं असून दोन्ही गटामध्ये बाचाबाची झाली आहे. महाविकास आघाडीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला असून आंदोलन आक्रमक झालेले आहेत.



दरम्यान, पोलिसी बळाचा वापर करीत पोलिसांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित करण्यात आलेला मेळावा बंद पाडला आहे. तसेच मेळावास्थळी येणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात येत आहे. आतापर्यंत मध्यवर्ती समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, माजी नगरसेवक नेताजी जाधव, नगरसेवक नेताजी जाधव, आर आय पाटील यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

मेळावा घेण्यासाठी एक महिन्यापूर्वी रितसर अर्ज करून देखील पोलिसांनी सोमवारी सकाळी मेळावा होणाऱ्या व्हॅक्सीन डेपो मैदान परिसरात 144 कलम लागू करीत या ठिकाणी येणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली असून अटक केलेल्या कार्यकर्त्यांना कोणत्या ठिकाणी नेण्यात आले आहे याबाबतची माहिती देखील पोलिसांकडून दिली जात नसल्याचे दिसून येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने