मविआ खासदारांच्या दिल्ली दौऱ्यानंतर हालचालींना वेग; शहांनी बोलावली दोन्ही राज्यांची बैठक

नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर आता केंद्राकडून आता हालचाली सुरु झाल्या आहेत. नुकतीच राज्यातील महाविकास आघाडीच्या खासदारांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर या हालचालींना वेग आला आहे. त्यानुसार, अमित शहा यांनी बैठक बोलावली आहे.CM बोम्मई म्हणाले, "केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांच्या प्रमुखांची परवा (१४ डिसेंबर) बैठक बोलावली आहे" काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या खासदारांनी दिल्लीत जाऊन अमित शहांची भेट घेतली होती. यामध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, वंदना चव्हाण, फौजिया खान, तर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, राजन साळवी, प्रियंका चतुर्वेदी आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.



दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासह गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवरुन राज्यात मोठं वादंग निर्माण निर्माण झालं आहे. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या खासदारांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्याची विनंती केली होती. यानंतर शहांनी सकारात्मक भूमिक घेतल्याचं सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं होतं.सीमाप्रश्नावर कर्नाटकच्या मुख्यंमत्र्यांनी चिथावणीखोर विधान केल्यानं हा वाद पेटला होता. जत तालुक्यातील गावांवर त्यांनी कर्नाटकचा हक्क सांगितला होता. त्यानंतर याचे हिंसक पडसाद उमटले होते. दोन्ही राज्यांमध्ये एसटींवर दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने