ब्रिटीशांना व्हिलन केलं आता त्यांच्याच यादीत 'RRR' सर्वोत्तम स्थानी!

मुंबई : देशभरामध्ये ज्या चित्रपटानं चाहत्यांना भारावून टाकलं त्या आरआआऱच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून आरआरआर पुन्हा ऑस्करच्या शर्यतीत असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. आता पुन्हा भारतीयांना अभिमान वाटावा अशी बातमी समोर आली आहे.



एस एस राजामौली यांनी दिग्दर्शित केलेल्या आरआरआऱ चित्रपटाचा आता ब्रिटिशांनी गौरव केला आहे. त्यांच्याच फिल्म इन्स्टियुटमधील २०२२ च्या सर्वोत्तम चित्रपटांमध्ये आरआरआऱचा समावेश करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल होताच त्यावर नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. या चित्रपटानं टॉम क्रुझच्या चित्रपटाला देखील मागे टाकले आहे. काही दिवसांपूर्वी देखील गोल्डन लायन पुरस्कारानं गौरविण्यात आले होते.

आरआरआऱसोबतच या यादीमध्ये आता द बॅनरेश ऑफ इन्शिरिन, चॉरलोट वेल्स, या चित्रपटांचाही समावेश करण्यात आला आहे. आरआरआर विषयी सॅम विग्ले यांनी पोस्ट लिहिली असून त्याचा शिफारस म्हणून विचार करण्यात आला आहे. आरआऱआऱ हा एक वेगळा अनुभव देतो. मोठ्या पडद्यावर पाहणे हा एक आनंददायी प्रवास आहे. असे त्यांनी म्हटले आहे. ब्रिटिश सर्वोत्तम चित्रपट यादीत हा मान मिळवणारा हा काही पहिलाच चित्रपट नाही तर शौनक सेन यांचा माहितीपट देखील या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने