शेतकरी दिवस का साजरा केला जातो? काय नेमका इतिहास

मुंबई: देशाचे माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 23 डिसेंबर रोजी भारतात 'शेतकरी दिन' साजरा केला जातो.भारत हा मुख्यत: खेड्यांचा देश आहे आणि खेड्यांमध्ये राहणारी बहुसंख्य लोकसंख्या शेतकरी आहे आणि शेती हा त्यांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे.अजूनही 70% भारतीय लोकसंख्या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून आहे. भारतातील शेतकरी हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. शेतकऱ्यांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी, दरवर्षी 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला जातो. भारताचे 5 वे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त देशात 23 डिसेंबर रोजी किसान दिवस साजरा केला जातो.




चौधरी चरण सिंह यांचा जन्म 23 डिसेंबर 1902 रोजी उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील नूरपूर गावात एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला होता. चौधरी चरण सिंह 1979-1980 दरम्यान भारताचे पंतप्रधान होते आणि त्यांनी देशातील अनेक शेतकरीसंबंधी सुधार धोरणांमध्ये योगदान दिले.चौधरी चरणसिंह यांचे आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि शेतकर्‍यांच्या हिताच्या विविध धोरणांनी भारतातील सर्व शेतकर्‍यांना जमीनदार आणि धनदांडग्यांच्या विरोधात एकत्र केले. भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेल्या 'जय जवान जय किसान' या प्रसिद्ध घोषणेचे त्यांनी पालन केले. चौधरी चरणसिंह हे एक अतिशय यशस्वी लेखक होते आणि त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली ज्यात शेतकरी आणि त्यांच्या समस्यांबद्दल त्यांचे विचार मांडले गेले. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी विविध उपायांच्या स्वरूपात खूप प्रयत्न केले.चौधरी चरणसिंह हे शेतकरी कुटुंबातील होते आणि त्यामुळे भारताचे माननीय पंतप्रधान असूनही त्यांनी अतिशय साधे जीवन जगले.

आता बघू या  शेतकरी दिवसाचा नेमका इतिहात...

देशाचे पंतप्रधान म्हणून अल्प कालावधीत चौधरी चरणसिंग यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कठोर परिश्रम घेतले. त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजनाही सुरू केल्या. सावकार आणि त्यांच्या अत्याचारांपासून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांनी १९३९ मध्ये कर्जमुक्ती विधेयक आणले. 1962-63 पर्यंत त्यांनी सुचेता कृपलानी यांच्या मंत्रालयात कृषी आणि वनमंत्री म्हणूनही काम पहिले. 2001 मध्ये तत्कालीन सरकारने चरणसिंग यांची जयंती किसान दिवस म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने