'संविधान वाचवायचे असेल तर मोदींना मारायला तयार राहा'; कांँग्रेस नेत्यांचं वादग्रस्त विधान

मुंबई: काँग्रेस नेते आणि माजी मंत्री राजा पटेरिया यांनी पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका सभेत भाषण करताना राजा पटेरिया म्हणाले की, पीएम मोदींना मारण्यासाठी तयार राहा. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. राजा पटेरिया म्हणाले की, मोदी जात, धर्म आणि भाषेच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडतील. दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांचे भावी जीवन धोक्यात आले आहे. संविधान वाचवायचे असेल तर मोदींना मारायला तयार आहे. चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी राजा पटेरिया यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याच्या सूचना दिल्या आहेत.



राजा पटेरिया पन्ना जिल्ह्यातील पवई येथे काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना राजा पटेरिया म्हणाले की, माझे विधान चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारणे म्हणजे निवडणूकीत हरवणे असा माझ्या बोलण्याचा अर्थ होता. त्याचवेळी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, भारत जोडो यात्रा करणारे देश तोंडण्याची कृत्ये करत आहे. अशी विधाने करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. त्याचवेळी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सरकार अशा वक्तव्यांवर कडक कारवाई करेल, असेही म्हंटले आहे.

मूळचे खजुराहोचे रहिवासी असलेले राजा पटेरिया हे काँग्रेसचे माजी आमदार राहिले आहेत. ते काँग्रेस कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणत आहेत की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी धर्म, जात, भाषेच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडतील. दलित, आदिवासी, अल्पसंख्याकांचे जीवन धोक्यात आहे. संविधान वाचवायचे असेल तर मोदींना मारायला तयार राहा.''हा व्हिडिओ पन्ना जिल्ह्यातील पवईमध्ये रेकॉर्ड करण्यात आला आहे. पवईतील मुक्कामा दरम्यान ते काँग्रेस नेत्यांना संबोधित करत होते, त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते.राजा पटेरिया वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी दमोह येथील आदिवासींची बाजू घेत एका पोलीस अधिकाऱ्याला फोनवरून धमकी दिली होती. आदिवासींचे ऐकले नाही तर आदिवासींना नक्षलवादी बनवू, असे राजा पटेरिया म्हणाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने