गुजरात निवडणुकीत मोदींनी कोविडचे नियम पाळले होते का? आरोग्यमंत्र्यांच्या पत्रावर काँग्रेसचा हल्लाबोल

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया  यांनी राहुल गांधी  आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना 'कोविड प्रोटोकॉल'बाबत  लिहिलेल्या पत्रावर काँग्रेसनं जोरदार प्रहार केलाय. या पत्रावरुन काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी  यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. ते म्हणाले, भारत जोडो यात्रा पाहून मोदी सरकार जळत आहे. सर्वसामान्यांचं लक्ष वळवण्यासाठी ते विविध समस्या निर्माण करत आहेत. भाजपला विचारायचं आहे की, गुजरात निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी कोविड प्रोटोकॉलचे सर्व नियम पाळलेत का? पंतप्रधान मोदींनी मास्क घालून घरोघरी प्रचार केला होता का? मला वाटतं, मनसुख मांडविया यांना राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आवडत नाही, पण लोकांना ती आवडलीये. लोक यात गुंतत आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय, काँग्रेस नेते पवन खेरा यांनी सरकारला कोविड धोक्यासाठी संसदेचं अधिवेशन थांबवणार का? असा सवाल केलाय.



आरोग्यमंत्र्यांनी राहुल गांधींना लिहिलं पत्र

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी काल म्हणजेच, 20 डिसेंबर रोजी राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहिलं होतं. पत्रात त्यांनी 'भारत जोडो यात्रे'मध्ये कोविड नियमांचं पालन करावं किंवा यात्रा पुढं ढकलण्यास सांगितलं होतं. पत्रात आरोग्यमंत्र्यांनी ‘भारत जोडो यात्रे’मध्ये कोविडचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केलीये. राजस्थानमध्ये सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेत कोविड मार्गदर्शक तत्त्वांचं काटेकोरपणे पालन करण्यात यावं, असं आरोग्यमंत्र्यांनी पत्रात लिहिलंय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने