निष्काळजीपणाने गेला मिस्त्रींच्या जीव? चालक अनाहितांना सातवेळा बसलेला दंड

मुंबई: स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनाहिता पांडोळे यांच्याविरुद्ध वेगात आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात, एका पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी (15 डिसेंबर) सांगितले की, डॉ. अनाहिता पांडोळे यांनी यापूर्वीही अनेकदा वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे. 2020 पासून आतापर्यंत बर्‍याच वेळा, पांडोळे यांना वेगात गाडी चालवल्याबद्दल दंड भरावा लागला आहे. सायरस मिस्त्री कार अपघात प्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील पोलिसांना तपासादरम्यान या गोष्टी समोर आल्या आहेत.



टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (वय 54) आणि त्यांचे मित्र जहांगीर पांडोळे यांचा या वर्षी 4 सप्टेंबर रोजी पालघर जिल्ह्यातील सूर्या नदीच्या पुलावर मर्सिडीज बेंझ कार रेलिंगला धडकल्याने मृत्यू झाला. अपघात झाला त्यावेळी डॉ.अनाहिता पांडोळे गाडी चालवत होत्या. या घटनेत अनाहिता आणि तिचा पती डेरियस गंभीर जखमी झाले होते ते सर्वजण अहमदाबादहून मुंबईला परतत होते. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, तपासादरम्यान असे आढळून आले की, अनाहिता पांडोळे यांनी यापूर्वी अनेकदा वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे.

पालघरचे एसपी बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, "डॉ. अनाहिता यांना किमान सात वेळा ओव्हरस्पीडिंग करताना पकडण्यात आले होते आणि स्पीड कॅमेर्‍यांनी या घटनांचे रेकॉर्डिंग केले आहे." या सर्व घटना 2020 च्या आहेत. या घटना सप्टेंबर 2022 मध्ये झालेल्या अपघाताच्या दिवसांच्या दरम्यान घडल्या आहेत. त्यांच्याविरुद्ध जारी केलेली ई-चलान आता आरोपपत्रात समाविष्ट केली जातील. पालघरमध्ये अपघात झालेल्या कारच्या विरोधात ही चालान जारी करण्यात आली होती असंही पाटील यांनी सांगितले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने