जेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांचे विमान क्रॅश झाले...

दिल्ली : वल्लभभाईंना दिल्लीहून जयपूरला घेऊन जाणाऱ्या विमानाचा संपर्क तूटल्याचे वृत्त ऑल इंडिया रेडिओनं 29 मार्च, 1949 रोजी रात्री 9 वाजताच्या बातम्यांमध्ये दिले. आकाशवाणीने प्रसारित केल्यावर संपूर्ण देशात खळबळ उडाली. सर्वत्र भीती आणि चिंतेची लाट पसरली.जे विमान जेमतेम तासाभरात पोहोचायला हवे होते. त्याची अनेक वेळ माहिती नव्हती. त्या दिवशी नेमके काय घडले. सरदार वल्लभभाई मरणाला हरवून कसे परत आले, हे पाहुयात. आज वल्लभभाईंचा स्मृतीदीन. 15 डिसेंबर 1950 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. देशावर अधिराज्य गाजवणारा एक सुंदर नेता आपण गमावला. वल्लभभाईंचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी गुजरातमधील नडियाद येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव झवेरभाई पटेल आणि आईचे नाव लाडबा देवी होते.



सरदार पटेल यांचे प्राथमिक शिक्षण करमसद येथे आणि उच्च माध्यमिक शिक्षण पेटलाद येथे झाले. ते 17 वर्षांचे असताना त्यांचे लग्न गण गंच येथील झवेरबा यांच्याशी झाले. त्यानंतर पटेल यांनी गोध्रा येथे वकील म्हणून कायदेशीर प्रॅक्टिस सुरू केली. वकील म्हणून त्यांनी झपाट्याने यश मिळवले आणि लवकरच फौजदारी खटले चालवणारे आघाडीचे वकील बनले. बॅरिस्टरचे शिक्षण घेण्यासाठी ते लंडनला गेले आणि अहमदाबादला येऊन कायद्याची प्रॅक्टिस करू लागले. त्यावेळी त्यांना महात्मा गांधींकडून खूप प्रेरणा मिळाली होती. त्यामुळेच त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला.

त्यादिवशी काय घडलं

त्यादिवशी संध्याकाळी 05.32 वाजता पटेल यांनी पालम विमानतळ दिल्लीहून जयपूरला कन्या मणि बेहेन, जोधपूरचे महाराजा आणि सचिव शंकर यांच्यासोबत डव्ह नावाच्या विमानातून उड्डाण केले. तिथून जयपूर 158 मैल दूर होते. त्यामूळे त्या विमानाने एका तासात पोहचायला हवे होते. मात्र यादरम्यान त्यांचा विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला.मुलगी मणिबेन, जोधपूरचे महाराजा आणि सचिव व्ही शंकर यांच्यासह सरदार पटेल यांनी सायंकाळी 5 वाजून 32 मिनिटांनी दिल्लीच्या पालम विमानतळावरून उड्डाण घेतलं होतं. जवळपास 158 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी त्यांना एक तासापेक्षाही कमी वेळ लागायला हवा होता. वल्लभभाई पटेल यांच्या हृदयाची स्थिती पाहता पायलट फ्लाइट लेफ्टनंट भीम राव यांना विमान 3000 फुटांपेक्षा अधिक उंचावर न्यायचे नाही, अशा सूचना होत्या.

मात्र, सुमारे सहा वाजता जोधपूरच्या महाराजांनी पटेल यांना विमानाचं एक इंजिन बंद पडल्याचं सांगितलं. जोधपूरच्या महाराजांकडे फ्लाइंग लायसन्सही होतं. त्याचवेळी विमानातील रेडिओनंही काम करणं बंद केलं होतं. त्यामुळं विमान फार वेगानं खाली येऊ लागलं. "पटेल यांच्यावर त्याचा काय परिणाम झाला हे तर सांगता येणार नाही. मात्र वर वर पाहता त्यांना फार काही फरक पडला नव्हता. जणू काहीच झालं नाही, अशा पद्धतीनं ते शांतपण बसून होते," असं सरदार पटेल यांचे सचिव राहिलेल्या व्ही शंकर यांनी 'रेमिनेंसेज' या आत्मचरित्रात सांगितलं आहे.पायलटनं जयपूरपासून 30 मैल उत्तरेला विमानाचं क्रॅश लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. क्रॅश लँडिंग करताना विमानाचा दरवाजा अडकू शकतो, त्यामुळं प्रवाशांनी लवकरात लवकर वरच्या बाजुला असलेल्या आपत्कालीन दरवाजातून बाहेर पडावं असं सांगण्यात आलं. कारण क्रॅश लँड करताच विमानात आग लागण्याची शक्यता होती.

सहा वाजून 20 मिनिटांनी पायलटनं सर्वांना सीट बेल्ट बांधायला सांगितलं. पाच मिनिटांनी पायलटनं विमान जमिनीवर उतरवलं. विमानात आग लागली नाही, किंवा दरवाजाही अडकला नाही. काही वेळातच जवळच्या गावातील लोक तिथं पोहोचले. विमानात सरदार पटेल आहेत, हे समजताच त्यांच्यासाठी पाणी आणि दूध मागवण्यात आलं. शिवाय त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्थाही करण्यात आली. या संकटात सरदार पटेल मरणालाही हरवून परतले.वल्लभभाई पटेल यांना लोहपुरुष म्हणून ओळखले जाते. तो शूरवीरापेक्षा कमी नव्हता. २०० वर्षांच्या गुलामगिरीत अडकलेल्या देशातील विविध राज्यांना त्यांनी एकत्र करून भारतात विलीन केले आणि या मोठ्या कार्यासाठी त्यांना लष्करी बळाचीही गरज भासली नाही. ही त्याची सर्वात मोठी कीर्ती होती, जी त्यांना सर्वांपासून वेगळे करते. १९४८ मध्ये गांधीजींच्या मृत्यू झाला आणि त्याच्या मनावर या घटनेचा आघात झाला. काही महिन्यांनंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला, ज्यातून ते सावरू शकले नाहीत आणि १५ डिसेंबर १९५० रोजी त्यांनी हे जग सोडले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने