आदित्य ठाकरेंची नार्कोटेस्ट होणार?

मुंबई : राज्यात पुन्हा अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणावरुन वाद उफाळून आला आहे. काही दिवसांपूर्वीच सीबीआयने शिवसेनेचे नेते आणि माजीमंत्री आदित्य ठाकरे यांना क्लिनचीट दिली. या प्रकरणात नारायण राणे कुटुंबाकडून सातत्याने आदित्य ठाकरे यांचं नाव घेण्यात येत आहे. दरम्यान, आदित्य ठाकरेंची नार्कोटेस्ट होणार? असल्याची चर्चाही रंगली आहे. आणि अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.




काय म्हणाले राणे?

काल मी आदित्य ठाकरेंची भूमिका ऐकली पण मी त्यांना काडीची किंमत देत नाही. त्यांच्याच किचन कॅबिनेटमधील एक खासदाराने दिलेल्या माहितीनुसार, रिया चक्रवर्ती आणि त्याच्यामध्ये जेव्हा ४४ कॉल्स झाले. त्याच्यामध्ये एयु म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे आहेत. मग याची चौकशी झाली पाहिजे. राहुल शेवाळे यांनी आता महत्त्वाची भूमिका घेतली आहे.त्यामुळे आदित्य ठाकरे यांची नार्कोटेस्ट करा. जसे श्रद्धा वालेकरच्या केसमध्ये आफताबची नार्कोटेस्ट झाली आणि सत्य बाहेर पडले. तसेच, आदित्य ठाकरे यांची नार्कोटेस्ट करा.म्हणजे A फॉर आफताब A फॉर आदित्य सगळ्या विकृतींची नावं एकसारखीच झाली आहेत. त्यामुळे एकदा नार्कोटेस्ट करा म्हणजे सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यूप्रकरणाचं सत्य बाहेर येईल.

राहुल शेवाळेंचे गंभीर आरोप

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला ‘AU’ नावाने ४४ वेळा फोन आले. ‘एयू’चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा होतो, असा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केला आहे. शेवाळे यांच्या आरोपानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने