भारी ऑफर! जुना फोन द्या अन् Samsung चा हँडसेट अवघ्या १ हजारात घरी घेऊन जा, पाहा डिटेल्स

मुंबई:  भारतीयांमध्ये Samsung चे स्मार्टफोन्स विशेष लोकप्रिय आहेत. कंपनीच्या कमी बजेटमध्ये येणाऱ्या फोन्सला ग्राहकांची विशेष पसंती मिळते. आता कंपनीने नववर्षाच्या निमित्ताने आपल्या लोकप्रिय बजेट स्मार्टफोन Galaxy M32 Prime Edition वर ऑफरची घोषणा केली आहे. या फोनला तुम्ही ई-कॉमर्स साइट Amazon वरून स्वस्तात खरेदी करू शकता. फोनवरील या ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Samsung Galaxy M32 Prime Edition ची किंमत आणि ऑफर्स

Samsung Galaxy M32 Prime Edition स्मार्टफोन ई-कॉमर्स साइट Amazon वर १३,४९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. यावर तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर्सचा फायदा मिळेल. HSBC बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ३०० रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. याशिवाय, एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे.सॅमसंगच्या या फोनवर तुम्हाला १२,६५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. परंतु, ही ऑफर तुमच्या जुन्या फोनच्या लेटेस्ट मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे. या ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास सॅमसंगच्या या फोनला फक्त ८५० रुपयात खरेदी करता येईल.




Samsung Galaxy M32 Prime Edition चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M32 Prime Edition फोनमध्ये ६.४ इंच एमोलेड डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. तसेच, मीडियाटेक हीलियो जी८० प्रोसेसरसह ६ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल.फोनमध्ये फोटोग्राफीसाठी क्वाड-कॅमेरा सेटअप दिला असून, यात ६४ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा, २ मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा आणि २ मेगापिक्सल डेप्थ सेंसर मिळेल. पॉवर बॅकअपसाठी २५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. मात्र, फोनसोबत बॉक्समध्ये १५ वॉटचा चार्जर मिळतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने