"केळ्याचं स्टॉल लावा नाही तर अंडे विका", कपिल देवनी आयपीएल प्लेयर्सची काढली पिसे

मुंबई : भारताचा विश्वविजेता कर्णधार कपिल देव यांनी कोलकाता येथील एका कार्यक्रमात टीम इंडियाच्या खेळाडूंना आपला दृष्टिकोन बदलण्याचे आवाहन केले. मानसिक आरोग्य आणि दबावाबाबत वक्तव्य केले आहे. यावर बरीच टीकाही झाली होती. पण तरीही कपिल देव आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. त्याने पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटपटूंचे दडपण, मानसिक आरोग्य आणि वर्कलोड मॅनेजमेंटबाबत जोरदार वक्तव्य केले आहे.




भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव म्हणतात की, जर खेळाडूंना टीम इंडियासाठी खेळण्याची संधी मिळत असेल, तर त्यांना त्याचा अभिमान वाटायला हवा. क्रिकेटपटूंना खूप दडपण वाटत असेल तर त्यांना कोणी खेळायला सांगत नाही. ते जाऊन केळी आणि अंड्याचे दुकानही लावू शकतात.कपिल देव यांनी भारतीय खेळाडूंबद्दल बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही, अनुभवी अष्टपैलू खेळाडूंनी मानसिक आरोग्य आणि वर्कलोड मॅनेजमेंटबद्दल बोलले आहे. 120 कोटी लोकसंख्येच्या देशात जेव्हा तुम्हाला क्रिकेट खेळण्याची संधी मिळते तेव्हा खेळाडूंनी आनंदी व्हायला हवे, असे कपिल देव म्हणतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने