धोनी - पंतचे हितगुज! करिअर वाचवण्यासाठी बांगलादेश दौऱ्यावरून थेट गाठले दुबई?

मुंबई:  ऋषभ पंतने बांगलादेश दौऱ्यावरील कसोटी मालिकेत फलंदाजीत चांगली कामगिरी केली. मात्र वनडे आणि टी 20 क्रिकेटमध्ये पंतला लौकिकास साजेसा खेळ करता आला नाही. त्यामुळे त्याला वनडे आणि टी 20 संघातून नारळ मिळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पंतने थेट आपला गुरू महेंद्रसिंह धोनीला गाठले. तेही थेट दुबईत जाऊन! सोशल मीडियावर धोनी आणि पंतच्या दुबईतील फोटोची जोरदार चर्चा सुरू आहे.



महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षी धोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत महेंद्रसिंह धोनी, साक्षी धोनी आणि त्यांच्या जवळचे काही मित्र देखील दिसत आहेत. याच फोटोत ऋषभ पंत देखील असल्याने चर्चांना उधाण आले आहे.महेंद्रसिंह धोनी आयपीएल 2023 साठीचा लिलाव पार पडताच आपल्या मित्रांसोबत दुबईमध्ये सुट्टी घालवण्यासाठी रवाना झाला. सुट्टीदरम्यानही धोनीने आपली मेटॉरगिरी काही सोडली नाही. त्याने भारतीय संघातील मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील भवितव्य धोक्यात आलेल्या पंतला दुबईत बोलवून घेत त्याला गुरूमंत्र दिला. 

येत्या 3 जानेवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेत पंतसाठी करो या मरोची स्थिती असणार आहे. त्यामुळेच पंतने धोनीची शरण घेतली आहे. पंतने यापूर्वीही महेंद्रसिंह धोनीचा सल्ला वेळोवेळी घेतला आहे. यावेळी तर पंतचे संघातील स्थानच धोक्यात आले आहे. आता धोनीचा गुरूमंत्र पंतच्या किती कामी येतो हे येणारा श्रीलंका दौराच ठरवले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने