आनंदाची बातमी! कर्करोगाच्या रुग्णांवर कोरोना लस ठरतेय प्रभावी; संशोधनातून स्पष्ट

 मुंबई: कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शास्त्रज्ञ, लोकांना कोरोनाची लस घेण्याचे आवाहन करत आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोनाची लाट रोखण्यासाठी लोकांमध्ये आधीच विषाणूविरूद्ध अँटीबॉडीज असणे अत्यंत आवश्यक आहे.अँटीबॉडीजसाठी कोरोनाची लस महत्त्वाची आहे. एका नवीन संशोधनातून असे समोर आले आहे की, ब्लड कॅन्सरने ग्रस्त रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही कोरोनाची लस खूप प्रभावी आहे.

ब्लड कॅन्सरने त्रस्त व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती फारच कमकुवत असल्याचे सामान्यतः दिसून येते. ब्लड कॅन्सरने ग्रस्त व्यक्तीला अनेक आजारांनी घेरले आहे. त्यामुळे या लोकांना कोरोना होण्याचा धोका अधिक वाढतो.यासोबतच अनेक कॅन्सर उपचारांमुळे रुग्णांमध्ये अँटीबॉडीज तयार होत नाहीत. कोरोनाला रोखण्यासाठी वापरण्यात आलेली लस शरीरात उपस्थित असलेल्या टी पेशींना सक्रिय करू शकते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती दीर्घकाळ टिकतेमेडिकल सेंटर-युनिव्हर्सिटी ऑफ फ्रीबर्गंड आणि LMU म्युनिचच्या डॉक्टरांच्या नेतृत्वाखालील टीमने रक्त कर्करोगाच्या रूग्णांच्या रोगप्रतिकारक शक्तीचा अभ्यास केला. अनेक महिन्यांच्या अभ्यासा नंतर कोविड-19 विरूद्ध संरक्षण करण्यासाठी तीन लसी मिळाल्या होत्या.



LMU म्युनिक-युनिव्हर्सिटी ऑफ फ्रीबर्गंडचे मेडिकल सेंटर व्हायरोलॉजिस्ट प्रा. ऑलिव्हर टी. केपलर, डॉ. आंद्रिया केपलर-हॅफकेमेयर आणि डॉ. क्रिस्टीन ग्रील यांनी या अभ्यासाचे नेतृत्व केले. या अभ्यासात असे आढळून आले आहे की, कोविड लस या रुग्णांना SARS-CoV2 सारख्या गंभीर आजारापासून वाचवते.अभ्यासात असेही दिसून आले आहे की, जे रुग्ण अँटीबॉडी बनवू शकतात त्यांच्या शरीरात जास्त प्रमाणात अँटीबॉडी असतात. प्रो. ऑलिव्हर टी. केपलर म्हणाले, “कोविड-19 लसीकरणामुळे विविध प्रकारचे रक्त कर्करोग असलेल्या रुग्णांमध्ये चांगल्या अँटीबॉडीज दिसून आल्या आहेत.बी-सेल लिम्फोमा किंवा मल्टिपल मायलोमा असलेल्या रूग्णांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय लसीच्या अनेक डोसची शिफारस केली जाऊ शकते. त्यांचं लसीकरण केल जाऊ शकत".


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने