गुजरातमध्ये मतदानाचे अपडेट्स जाणून घ्या; 'आप'ने गंभीर आरोप केले आहेत

गुजरात : गुजरात विधानसभेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिल्या टप्प्यासाठी १९ जिल्हे आणि ८९ मतदारसंघांमध्ये मतदान सुरु आहे. या ८९ मतदारसंघांमध्ये ७८८ उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत.गुजरातमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत १८.९५ टक्के मतदान झालेलं आहे. आम आदमी पक्षाचे गुजरात अध्यक्ष गोपाल इटालिया यांनी धिम्या वोटिंगचा आरोप लावला आहे. त्यांनी ट्विट केलं की, कतारगाम विधानसभा मतदारसंघामध्ये जाणीवपूर्वक धिम्या गतीने मतदान सुरु आहे.इटालिया यांनी निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले आहेत. अशाच प्रकारे जर गुंडांच्या दबावाखाली मतदान घ्यायचं असेल तर निवडणुका का घेता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने