'आम्ही कर्नाटकात जाणारच'; अमित शहांच्या निर्णयानंतरही शंभूराज देसाई भूमिकेवर ठाम!

मुंबई: महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमावादावर तोडगा काढण्यासाठी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई  यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. त्यामुळं आता सीमावादावर पडदा पडण्याची आशा व्यक्त केली जात आहे.



त्यातच आता सध्या महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचातींच्या निवडणुका  जाहीर झाल्या आहेत. त्यामुळं अनेक राजकीय नेते विविध भागांचा दौरा करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सीमाभागातील मराठी भाषिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी समन्वयक मंत्री शंभूराज देसाई सीमाभागाचा दौरा करणार आहेत. बेळगाव शहराजवळील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सीमाभागातील शिनोळी गावात शंभूराज देसाई यांची सभा होणार आहे. मंत्री देसाई सीमाभागाबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजचाही दौरा करणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर माध्यमांनी देसाईंशी संवाद साधला असता ते म्हणाले, आम्ही कर्नाटकात जाणार आहोत. सीमाभागातील गावांना सवलतीही देणार आहोत. याबाबत मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. आज माझी शिनोळी गावात सभा होत असून येथील मराठी बांधवांशी मी संवाद साधणार आहे. त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे. सीमेलगतची गावं आमचीच आहेत, त्यामुळं कर्नाटकातील मराठी बांधव मला भेटायला आल्यावर त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहे, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात दौरा आणि इतर कार्यक्रमानिमित्त शंभूराज देसाई आज दौरा करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने