मुंबईत अग्नितांडव! लालबागमधील अविघ्न पार्क इमारतीला लागली आग

मुंबई: मुंबईतील लालबाग परिसरातील वन अविघ्न पार्क सोसायटीतील इमारतीच्या 35 व्या मजल्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग अटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आगीमुळे अनेक लोक अडकल्याची माहिती समोर आली आहे.आज सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी ही आग लागली असल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. ही लेव्हल-1 ची आग असल्याची माहिती समोर आली आहे. 




दरम्यान आग विझवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आग लागण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. याआधी इमारतीच्या 19 व्या मजल्यावर आग लागली होती. त्यावेळी आगीचे लोट 25 व्या मजल्यापर्यंत पोहोचले होते.गेल्या वर्षीही वन अविघ्न इमारतीला मोठी आग लागली होती. या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, वर्षभरानं पुन्हा एकदा वन अविघ्न इमारतीला नेमकी आग कशामुळे लागली? या आगीचं नेमकं कारण काय? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने