पब्लिक टॉयलेटमध्ये आलियावर चर्चा करत बसले होते अनिल कपूर आणि विजय वर्मा..असं काय घडलं होतं?

मुंबई : आलिया भट्टचा 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमानं यावर्षी बॉक्सऑफिसवर जोरदार कमाई केली होती. भारतात जवळपास १३० करोडहून अधिक या सिनेमानं कमावले. यातील आलियाचा अंदाज पाहून सगळेच भारावले होते. समिक्षकांपासून सर्वसामान्यांपर्यंत साऱ्यांनीच आलियाच्या परफॉर्मन्सची जोरदार प्रशंसा केली.आता आलियासोबत 'डार्लिंग्स' सिनेमात काम करणाऱ्या अभिनेता विजय वर्मानं एक किस्सा ऐकवला आहे,ज्यात तो आहे,अनिल कपूर आहेत आणि आलिया भट्ट..हा किस्सा आहे बाथरुममधला. यावेळी अनिल कपूर यांनी आलियाची 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमातील भूमिकेसाठी खूप प्रशंसा तर केलीच होती शिवाय ती हॉलीवूडमध्ये जाणार अशी भविष्यवाणी देखील केली होती.



विजय वर्मा यानं एक किस्सा सांगताना म्हटलं की,''अनिल कपूर आणि माझी पहिली भेट बाथरुममध्ये झाली होती आणि त्यावेळी आलियाचा 'गंगूबाई काठियावाडी' पाहून ते खूपच इम्प्रेस झाले होते. विजय म्हणाला,''आम्ही गंगूबाईच्या स्क्रीनिंगला गेलो होतो,यश राज स्टुडियोत. अनिल कपूर माझ्या आयडॉलपैकी एक आहेत. आणि त्यांना मी तिथेच पहिल्यांदा भेटलो. मी इंटरवलमध्ये बाथरुमला गेलो आणि तेवढ्यात तिथे अनिल कपूर पोहोचले. त्यांना पहिल्यांदा माझ्या समोर पाहून मी हडबडलो. पण ते ओळख नसतानाही वर पाहून माझ्याशी बोलायला लागले,''पिक्चर सही जा रही है..बहुत अच्छा कर रही है लडकी''. आणि माझ्याकडे बघायला लागले..मग पी पण, ''हो..हो..''म्हटलं.पण गोष्ट इथेच नाही संपत..सिनेमाची स्क्रीनिंग संपल्यावर अनिल कपूर पुन्हा विजयला त्याच बाथरुममध्ये दिसले. विजय म्हणाला,''पुन्हा यांनी वर पाहत बोलायला सुरुवात केली..म्हणाले..''इतना अच्छा नही करने का..इतना अच्छा करेगी न. तो कौन बनाएगा..अब क्या करेगी..आणि पुढे म्हणाले,हॉलीवूड..अब हॉलीवूड करेगी वो..''

आणि बघा..वेळेनं आपली जादू दाखवली. अनिल कपूर यांची भविष्यवाणी खरी ठरली. फेब्रुवारीत 'गंगूबाई काठियावाडी' थिएटर्समध्ये रिलिज झाला आणि मार्चमध्ये नेटफ्लिक्सने घोषणा केली होती की, आलिया,गल गडौत आणि जेमी डोर्नन त्यांच्या आगामी 'हार्ट ऑफ स्टोन' सिनेमात काम करणार आहेत. मे मध्ये आलिया आपल्या पहिल्या हॉलीवूड सिनेमाचं शूट करायला अमेरिकेला गेली होती. आणि जुलैमध्ये ते शूट संपवून ती परत आली.विजय वर्माविषयी बोलायचं झालं तर त्यानं 'डार्लिंग्स' सिनेमात आलियाचा पती हम्जाची व्यक्तिरेखा साकारली होती. खलनायकी भूमिकेत त्याला लोकांनी खूप पसंत केलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने